Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kalyan Murbad Pickup Viral Video: माळशेज घाटात थरार! मद्यधुंद पिकअप चालकाचा धिंगाणा… अखेर असा झाला शेवट

Kalyan Murbad Pickup Viral Video: कल्याण-मुरबाड-अहिल्यानगर महामार्गावर भरधाव पिकअप वाहनाच्या धोकादायक ड्रायव्हिंगमुळे काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. वाहन वारंवार रस्त्याच्या दोन्ही बाजूंना भरकटत असल्याने इतर वाहनचालकांना मोठा धोका निर्माण झाला.

  • By Riddhi Vanne
Updated On: Jul 27, 2026 | 01:41 PM
Kalyan Murbad Pickup Viral Video (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Kalyan Murbad Pickup Viral Video (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • कल्याण-मुरबाड-अहिल्यानगर महामार्गावर भरधाव पिकअप वाहनाने धोकादायक 
  • शिवळे गावाजवळ वाहन वारंवार भरकटत असल्यामुळे दुचाकीस्वारांसह इतर वाहनचालकांचा जीव धोक्यात 
  • काही कारचालक आणि स्थानिकांनी प्रसंगावधान राखत पिकअपचा पाठलाग केला 
  • या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल 
 

कल्याण-मुरबाड-अहिल्यानगर महामार्गावर रविवारी घडलेल्या एका घटनेने वाहनचालकांची चांगलीच धडकी भरली. भरधाव वेगात धावणाऱ्या एका पिकअपने काहीकाळ संपूर्ण रस्त्यावर गोंधळाचे वातावरण निर्माण केले. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने इतर वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागला. सुदैवाने मोठा अपघात टळला, मात्र या प्रकारामुळे काही काळ महामार्गावर भीतीचे वातावरण निर्माण झाले.

पिकअप वाहन अचानक भरकटू लागली…

मिळालेल्या माहितीनुसार, शिवळे गावाजवळ भाजीपाला घेऊन जाणारे पिकअप वाहन अचानक भरकटू लागले. वाहन कधी एका बाजूला तर कधी दुसऱ्या बाजूला जात असल्याचे पाहून मागून येणाऱ्या वाहनचालकांना संशय आला. काही अंतरापर्यंत हा प्रकार सुरूच राहिला. दरम्यान, रस्त्यावरून जाणाऱ्या दोन दुचाकीस्वारांना या वाहनामुळे मोठा धोका निर्माण झाला. मात्र, त्यांनी प्रसंगावधान राखत वेळेत बाजूला होत स्वतःचा जीव वाचवला.

A pickup truck swerving across lanes on Malshej Ghat. Off the road into a puddle, narrowly missing a biker. Then straight into oncoming traffic. Witnesses assumed drunk driving. When they finally forced the truck to stop, the driver was still holding his phone to his ear.… pic.twitter.com/rxqF3TI8Rz — Rajneeti Tadka 🌶️ 🔥 (@RajneetiTadka) July 26, 2026

पिकअपचा पाठलाग सुरू

वाहनाची धोकादायक हालचाल पाहून काही कारचालकांनी आणि स्थानिकांनी एकत्र येत पिकअपचा पाठलाग सुरू केला. योग्य संधी मिळताच त्यांनी स्वतःची वाहने पुढे लावून पिकअपचा वेग कमी केला आणि अखेर ते वाहन थांबवण्यात यश मिळवले. या संपूर्ण घटनेदरम्यान रस्त्यावर काही काळ तणावाचे वातावरण होते. (Kalyan Murbad Pickup Viral Video)

मोबाईलवर बोलण्यात व्यस्त

वाहन थांबल्यानंतर चालकाची अवस्था पाहून उपस्थित नागरिकांना धक्का बसला. तो मद्याच्या नशेत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. लोकांनी त्याला याबाबत विचारणा केली, मात्र तो कोणाशी तरी मोबाईलवर बोलण्यात व्यस्त होता. त्यामुळे उपस्थितांचा संताप आणखी वाढला. इतरांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या या चालकाला काही नागरिकांनी चांगलाच जाब विचारला. काहींनी त्याला मारहाणही केल्याचे सांगितले जात आहे.

Soya Chaap Viral Video: सोया चाप खाणाऱ्यांनी सावधान! हा व्हिडीओ एकदा पाहाच

अधिक तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जमावाला शांत केले आणि संबंधित चालकाला ताब्यात घेतले. त्यानंतर वाहनही जप्त करण्यात आले. चालकाने मद्यपान केले होते का, याची खात्री करण्यासाठी आवश्यक तपासणी करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे. या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

कारवाई स्पष्ट दिसत असल्याचे सांगितले

या घटनेचा थरार एका कारमध्ये बसवलेल्या डॅशकॅममध्ये कैद झाला आहे. व्हिडिओमध्ये पिकअपची बेफाम धाव, वाहनचालकांची धावपळ आणि अखेरीस नागरिकांनी केलेली कारवाई स्पष्ट दिसत असल्याचे सांगितले जात आहे. हा व्हिडिओ तपासासाठी पोलिसांकडे देण्यात आला असून, त्याच्या आधारे पुढील चौकशी केली जाणार आहे.

AC Train Puja: रेल्वेच्या एसी कोचमध्ये पूजा अन् पेटवला दिवा; Viral Videoनंतर सुरक्षेची चिंता वाढली

दरम्यान, याच महामार्गावरील माळशेज घाट परिसरात आणखी एक गंभीर समस्या समोर आली आहे. मुसळधार पावसानंतर रस्त्याचा मोठा भाग खचल्याने वाहनचालकांसमोर नवीन संकट उभे राहिले आहे. जवळपास शंभर फूट लांबीचा आणि आठ फूट खोल भाग खचल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. सुदैवाने त्यावेळी त्या ठिकाणावरून कोणतेही वाहन जात नसल्याने मोठी दुर्घटना टळली.

Web Title: Drunk pickup driver creates chaos on kalyan murbad highway

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 01:41 PM

Topics:  

  • Accident
  • kalyan
  • monsoon rains

संबंधित बातम्या

Kalyan Crime : कल्याणच्या कुख्यात जालीम गँगवर मोक्का कारवाई; अमजद पठाणसह साथीदारांवर पोलिसांचा मोठा दणका
1

Kalyan Crime : कल्याणच्या कुख्यात जालीम गँगवर मोक्का कारवाई; अमजद पठाणसह साथीदारांवर पोलिसांचा मोठा दणका

Gondiya News: रोजगाराचा शोध काळाने रस्त्यावरच संपवला!  गोंदियामध्ये ट्रकच्या धडकेत मध्य प्रदेशातील ६ मजुरांचा मृत्यू
2

Gondiya News: रोजगाराचा शोध काळाने रस्त्यावरच संपवला!  गोंदियामध्ये ट्रकच्या धडकेत मध्य प्रदेशातील ६ मजुरांचा मृत्यू

१० हजार फुटांवरून कोसळली स्कायडायव्हर, तरीही वाचला जीव! अंगावर काटा आणणारा Video Viral
3

१० हजार फुटांवरून कोसळली स्कायडायव्हर, तरीही वाचला जीव! अंगावर काटा आणणारा Video Viral

दहीहंडीच्या जल्लोषाला गालबोट; १६८ गोविंदा जखमी, थरावरून पडून एका गोविंदाचा मृत्यू, तर खांब कोसळून चिमुकल्याचा अंत
4

दहीहंडीच्या जल्लोषाला गालबोट; १६८ गोविंदा जखमी, थरावरून पडून एका गोविंदाचा मृत्यू, तर खांब कोसळून चिमुकल्याचा अंत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.