World Tennis League : बेंगळुरूमध्ये रंगणार जागतिक टेनिसचा थरार; 17 डिसेंबरपासून वर्ल्ड टेनिस लीग
World Tennis League : आंतरराष्ट्रीय टेनिसमधील दिग्गज खेळाडू आणि भारतातील अव्वल टेनिसपटूंचा खेळ पाहण्याची संधी चाहत्यांना मिळणार आहे. वर्ल्ड टेनिस लीगच्या पाचव्या हंगामाचे आयोजन 17 ते 20 डिसेंबर 2026 दरम्यान बेंगळुरूमध्ये करण्यात येणार आहे. केएसएलटीए येथील एस. एम. कृष्णा टेनिस स्टेडियमवर चार दिवस ही स्पर्धा रंगणार आहे.
आयकॉनिक स्पोर्ट्स अँड इव्हेंट्सच्या मान्यता प्राप्त आयोजित होणाऱ्या या लीगमध्ये आघाडीचे आंतरराष्ट्रीय टेनिसपटू आणि भारतातील सर्वोत्तम खेळाडू सहभागी होणार आहेत. मागील चार हंगामांतील यशानंतर पाचव्या पर्वातही जागतिक दर्जाच्या टेनिसचा थरार अनुभवण्याची संधी चाहत्यांना मिळणार आहे.
मागील हंगामात सहभागी झालेले पॉला बडोसा, युक भांबरी, सुमित नागल, दक्षिणेश्वर सुरेश, माया राजेश्वरन रेवती आणि श्रीवल्ली भामिदिपती यांसारखे खेळाडू आगामी हंगामातही कोर्टवर उतरणार आहेत. त्यामुळे स्पर्धेबाबतची उत्सुकता वाढली आहे. पाचव्या हंगामातील खेळाडू आणि संघांची संपूर्ण यादी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
IND vs PAK: धुरळा उडणार! आरपारच्या लढाईत भारत-पाकिस्तान भिडणार; कधी अन् कुठे रंगणार महामुकाबला?
वर्ल्ड टेनिस लीगचे सह-संस्थापक महेश भूपती म्हणाले, मागील हंगामात आंतरराष्ट्रीय आणि भारतीय खेळाडूंच्या प्रभावी सहभागामुळे अनेक अविस्मरणीय सामने पाहायला मिळाले. चाहत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि स्पर्धेभोवती निर्माण झालेली ऊर्जा आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. पाचव्या हंगामात हीच गती कायम ठेवत लीग अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
लीगच्या सह-संस्थापिका हेमाली शर्मा म्हणाल्या, वर्ल्ड टेनिस लीग पुन्हा बेंगळुरूमध्ये आणताना आनंद होत आहे. या शहराला समृद्ध क्रीडा संस्कृती आणि टेनिसप्रेमी प्रेक्षकांचा मोठा वर्ग लाभला आहे. भारतातील प्रस्थापित आणि उदयोन्मुख खेळाडूंसह जागतिक दर्जाच्या टेनिसपटूंचा सहभाग यंदाच्या हंगामाचे वैशिष्ट्य असेल.
Mumbai City FC : आय-लीगचा गोलमशीन आता मुंबई सिटीच्या ताफ्यात; लुका माजसेनशी करार
2022 मध्ये दुबई येथे स्थापन झालेली वर्ल्ड टेनिस लीग ही मिश्र-लिंग सांघिक टेनिस स्पर्धा आहे. भारताचे माजी टेनिसपटू महेश भूपती यांनी या लीगची सह-स्थापना केली आहे. चार संघांमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत पुरुष एकेरी, महिला एकेरी आणि दुहेरी तसेच मिश्र दुहेरीचे सामने खेळवले जातात. राउंड रॉबिन पद्धतीने होणाऱ्या स्पर्धेत प्रत्येक गेममधील विजय संघाच्या गुणतालिकेत महत्त्वाचा ठरतो.
नोव्हाक जोकोविच, इगा स्वियातेक, डॅनिल मेदवेदेव आणि आर्यना सबालेंका यांसारख्या आंतरराष्ट्रीय टेनिसमधील नामवंत खेळाडूंनी यापूर्वी या लीगमध्ये सहभाग घेतला आहे. त्यामुळे पाचव्या हंगामात कोणते आंतरराष्ट्रीय स्टार सहभागी होणार, याकडे टेनिसप्रेमींचे लक्ष लागले आहे.
Ans: ही स्पर्धा 17 ते 20 डिसेंबर 2026 दरम्यान होणार आहे.
Ans: बेंगळुरूमधील केएसएलटीए येथील एस. एम. कृष्णा टेनिस स्टेडियमवर स्पर्धा खेळवली जाईल.
Ans: सुमित नागल, युक भांबरी, दक्षिणेश्वर सुरेश, माया राजेश्वरन रेवती आणि श्रीवल्ली भामिदिपती यांसारखे खेळाडू सहभागी होण्याची अपेक्षा आहे.






