Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अद्भूत! समुद्रात उभारले जाणार ८०,००० लोकांचे शहर, १ मैल लांबीच्या Freedom Shipची जगभर चर्चा; Video Viral

Freedom Ship Video : जगात प्रथमच, पाण्यावर चालणारे शहर! फ्रिडम शिप हा एक असा बिग बजेट प्रकल्प आहे ज्यात ८०,००० हजार लोकांना राहण्यासाठी विशाल जहाजाची निर्मिती केली जाईल. शहराप्रमाणेच यात बँकेपासून शाळांपर्यंत अनेक सुविधा देखील पुरवल्या जातील. याचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे ज्यातून आपण जहाजाची झलक पाहू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 18, 2026 | 11:06 AM
अद्भूत! समुद्रात उभारले जाणार ८०,००० लोकांचे शहर, १ मैल लांबीच्या Freedom Shipची जगभर चर्चा; Video Viral

अद्भूत! समुद्रात उभारले जाणार ८०,००० लोकांचे शहर, १ मैल लांबीच्या Freedom Shipची जगभर चर्चा; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • १ मैल लांबीच्या ‘फ्रीडम शिप’ प्रकल्पाची पुन्हा चर्चा, व्हायरल व्हिडिओमुळे उत्सुकता वाढली.
  • हजारो रहिवासी, पाहुणे आणि कर्मचाऱ्यांसाठी निवासासह विविध सोयींची संकल्पना.
  • अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक आणि प्रचंड आकारामुळे प्रकल्पाची अंमलबजावणी अद्याप अनिश्चित.
आपण आजवर जमिनीवर शहरांचे निर्माण होताना पाहिले आहे पण तुम्ही कधी समुद्रावर शहराचे निर्माण होताना कधी पाहिले आहे का? समोर आलेल्या माहितीनुसार, साइंस फिक्शन चित्रपटाचा सीन वाटावा अशी अनोखी घटना सत्यात घडून येणार आहे. साधारण १ मैल लांबीवर पाण्यात तरंगणारे शहर उभारण्याचा प्रकल्प आहे. हे शहर जहाजावर उभारले जाईल. मुख्य म्हणजे हे इतके मोठे जहाज असणार आहे ज्याला आजवर तुम्ही कधी स्वप्नातही पाहिले नसेल. हा प्रोजेक्ट यशस्वी झाला तर जगातील सर्वात अनोख्या आणि विशाल समुद्री प्रोजेक्टपैकी ते एक असेल. अलिकडे याचा एक नमुना व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे ज्यात तुम्ही या जहाजाची एक झलक पाहू शकता.

बाबा बोलवतायेत, बाळा उठ ना… Iskon मंदिरात दुर्घटना, विजेच्या झटक्याने बापासमोरच गेला मुलाचा जीव; हृदयद्रावक Video Viral

फ्रिडम शिप नक्की काय आहे?

जहाजावर शहर बनवण्याच्या या प्रोजेक्टला फ्रिडम शिप असे नाव देण्यात आले आहे. वास्तविक १९९० मध्ये अमेरिकन इंजिनीअर नॉर्मन निक्सन याने सर्वप्रथम याचा प्रस्ताव मांडला होता. परंतु त्यावेळी हा प्रस्ताव कागदांवरच राहून गेला. आता क्रूझ कंपनीने दावा केला आहे की, या प्रोजेक्टची डिमांड इतकी जास्त आहे की, एक नव्हे तर असे तीन जहाज देखील बनवले जाऊ शकतात. कंपनीच्या म्हणण्यानुसार, यासाठी डिजाइनर, प्रोजेक्ट मॅनेजर आणि नेव्हल आर्किटेक्ट टीम तयार करण्यात आली आहे.

सुविधांनी भरलेले असेल जहाज

हे फ्रीडम शिप अंदाजे ८०० फूट रुंद आणि ३० मजली उंच असेल. यात अंदाजे ५०,०० लोक १०,००० पाहुणे आणि २०,००० कर्मचारी कायमस्वरूपी राहू शकतील. याचाच अर्थ या जहाजात एक लहान शहराची लोकसंख्या सामावली जाण्याची शक्यता आहे. यात लोकांसाठी हाॅस्पिटल, शाळा, बँक, शाॅपिंग माॅल, रेस्टाॅरंट आणि कॅसिनो सारख्या सुविधा असतील.

मृत्यूच्या विळख्यातून तरुणाने असा वाचवला जीव, समुद्राच्या लाटांनी गिळलेच होते पण… घटनेचा थरारक Video Viral

न्यूक्लियर पाॅवरने चालणार जहाज

जर हे प्रोजेक्ट वास्तवात पूर्ण झाले तर हे फ्रिडम शिप न्यूक्लियर पाॅवरवर चालवले जाईल. तथापि, यासाठी कंपनीला १६ बिलियन डाॅलर्सच्या जवळपास फंडिग जमा करावी लागेल. सध्या कंपनीसाठी ही फंडीगच एक मोठे आव्हान असेल. कारण जगातील कोणतीही जहाजबांधणीची जागा (शिपयार्ड) ते सर्व एकाच वेळी एकत्र जोडण्याइतकी मोठी नाही.

Web Title: Floating city freedom ship project 80000 residents mile long ocean city viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 11:06 AM

Topics:  

  • America
  • trending
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral
1

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral
2

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral
3

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral

समुद्राच्या तळाशी प्रेमाची कबुली, प्रियकराने अनोख्या अंदाजात प्रेयसीला केलं प्रपोज; Video Viral
4

समुद्राच्या तळाशी प्रेमाची कबुली, प्रियकराने अनोख्या अंदाजात प्रेयसीला केलं प्रपोज; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.