(फोटो सौजन्य: Instagram)
समुद्रकिनाऱ्यावर वेळ घालवायला कुणाला आवडत नाही. इथे लोक शांतीच्या शोधात येतात परंतु सुमुद्राच्या लाटा कधीही खवळू शकतात त्यामुळे अशा ठिकाणी फिरताना जीवाची खास काळजी घ्यावी लागते. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसते की, एक व्यक्ती समुद्रात लाटांमध्ये वाईटरित्या अडकला आहे. लाटा इतक्या वेगाने वाहू लागतात की व्यक्तीचं त्यातून बाहेर निघणं कठीण होऊन बसतं.
व्हिडिओमध्ये, तो माणूस किनाऱ्यावर पोहोचण्यासाठी धडपडत असल्याचे दिसेल, पण शक्तिशाली लाटांपुढे तो हतबल होता. अथक प्रयत्नानंतर व्यक्ती कसाबसा स्वत:ला किनाऱ्यावर आणण्यात यशस्वी होतो. किनाऱ्याजवळील धावत त्याची मदत करतात आणि व्यक्तीला तिथून सुरक्षित ठिकाणी पोहचवतात. ही घटना सध्या सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. आपली जिद्द आपल्या वाईट परिस्थितीवर कशी मात करु शकते, याचे उत्तम उदाहरण तुम्हाला या घटनेतून घेता येईल.
View this post on Instagram
घटनेचा व्हिडिओ @postabcs नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘CSL मध्ये सतर्कतेचा इशारा! काबो सॅन लुकास (Cabo San Lucas) येथील समुद्रकिनाऱ्यावर एका पर्यटकाला जोरदार लाटांनी समुद्रात ओढून नेण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने, त्या पर्यटकाने स्वतःची सुटका करून घेतली आणि त्यांना त्वरित मदत मिळाली.’. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या घटनेवर आपले मत देखील व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “त्याला वाचवण्यासाठी धावून आलेला तो मित्र खरा माणूस आहे”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “त्या माणसाने ज्या प्रकारे जीव वाचवला, ते खरोखरच कौतुकास्पद आहे” आणखी एका यूजरने लिहिले आहे, “एक खरा प्रश्न – लाटेच्या विरुद्ध जाण्याऐवजी, त्या लाटेवर स्वार होऊन किंवा ‘बॉडी सर्फिंग’ करत किनाऱ्याकडे येण्याचा प्रयत्न करणे अधिक चांगले ठरले नसते का?”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






