Ganpati Visarjan in a UK river sparks pollution controversy video viral
आज अनंत चतुर्दशी. गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस. गेल्या दहा दिवसांत गणरायाच्या आगमनाने घराघरांत आनंदाचे, भक्ती आणि उत्साहाचे वातावारण होते. दररोजच्या आरती, पूजा, नैवेद्य व गजरांनी वातावरण मंगलमय झाले होते. पण आता आपल्या लाडक्या बप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे. यामुळे सगळ्यांच्या मनात हुरहूर लागली असले. बप्पा जाणार म्हणून डोळे भरुन आले असतील, पण बप्पाला देताना सर्वांच्या मनात आनंदही असले. कारण बप्पाचे आशीवार्द घेऊन त्यांना पुढच्या वर्षी लवकर येण्याची आपण प्रार्थना करतो. निरोप हा तात्पुरता असला तरी श्रद्धा आणि विश्वास कायम आहे. गणपत्ती बप्पाच्या आगमनाने एकोपा, प्रेम आणि भक्तीचे वृद्धिगत दृश्य आपल्याला पाहायला मिळते. आज दिवस निरोपाचा असला तर एका नव्या आशेचा आरंभ आहे, आपल्या बप्पाच्या परत येण्याची वाट पाहण्याचा आरंभ आहे.
याच वेळी सोशल मीडियावर गणपती बप्पाच्या विसर्जनाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ ब्रिटनमधील आहे. दरवर्षी गणपती बप्पाची धूम केवळ भारतातच नाही तर परदेशातही पाहायला मिळते. परदेशात राहणारे भारतीय लोक आनंदाने, थाटामाटात गणेशोत्सव साजरा करतात. यामध्ये परदेशी लोकांचाही सहभाग असतो. परंतु सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. ब्रिटनमध्ये विसर्जनाचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला गेला. ब्रिटनमधील भारतीयांना गणपती बप्पाचे नदीत मूर्ती विसर्जन केले आणि पंरपरा जपली. परंतु यावर पर्यावरण प्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे जल प्रदूषणाच्या वादाला तोंड फुचले असून, लोकांनी नदीत विसर्जनामूळे पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली आहे.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @thebharatpost_ या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. अनेकांनी परदेशात राहूनही भारतीय संस्कृती जपल्याने गणेशोत्सव साजरा करणाऱ्यांचे कौतुक केले आहे. मात्र काही लोकांनी यावर नाराजी व्यक्त करत, यामुळे परदेशातील लोक भारतीयांना परत हाकलून लावत असल्याचे म्हटले आहे. एका युजरने म्हटले आहे की, ब्रिटनमधील लोक त्यांच्या नद्या अगदी स्वच्छा ठेवतात, पण या भारतीयांनी इथेही सगळे खराब केले आहे, तर दुसऱ्या एका युजरने यांनी भारतीयांने नाव खराब केले असे म्हटले आहे. तर काहींना याचे समर्थन करत, परदेशी लोक क्रिसमसच्या वेळी फटाके वाजवता ते योग्य आहे, आणि आम्ही बप्पाचे विसर्जन केले की लगेच प्रदूषण होते का? असा प्रश्न केला आहे. यामुळे हा वाद सध्या सोशल मीडियावर चांगलाच रंगला आहे.
तसे तर परदेशातच नाही, तर भारतामध्ये लोकांना कृत्रिम पद्धतीने बप्पाचे विसर्जन करण्यास सांगितले जाते. यासाठी लोकांना मूर्तीचे दागिने आणि फुले काढून कृत्रिम तलावात मुर्ती विसर्जित करण्यास सांगितल्या जातात. (पर्यावरणाच्या संरक्षणासाठी मानवाने तयार केलेल्या तलांवामध्ये) जेणेकरून जलप्रदूषण टाळता येईल.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.