जपानमध्येही घुमला गणेशोत्सवाचा गजर! टोकियोच्या रस्त्यांवर गणपत्ती बप्पाच्या गाण्यावर थिरकले तरुण, Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
आपल्या गणपती बप्पाला येऊन पाच दिवस झाले आहेत. सध्या संपूर्ण देशात आनंदाचे, उत्साहाचे जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अनेक लोक गणपती बप्पाचे दर्शन घेण्यासाठी विविध मंदिरांना भेट देत आहे. हा सण भक्ती आणि श्रद्धेचे प्रतीक मानला जातो. पण तुम्हाला माहितीय का गणपती बप्पाची धूम केवळ भारतातच नाही, तर परदेशातही पोहोचली आहे. परदेशी लोक देखील गणेशोत्सवर साजरा करत आहे. परदेशातही सर्वत्र गणबपत्ती बप्पाची क्रेझ पाहायला मिळत आहे. याचे अनेक व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. नायजेरियामध्ये काही मुलांनी गणपती बप्पाच्या देवा श्री गणेशा गाण्यावर डान्स केला होता, तर आता जपानामध्येही या गाण्यावर लोक थिरकताना दिसत आहेत.
जपानच्या टोकियोमधून दोन व्हिडिओ व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये गणपत्ती बप्पाच्या गाण्यावर मुले थिरकताना दिसत आहे. यामध्ये एक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Meenaks06356943 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. तर दुसरा व्हिडिओ एक्सवर @Singham24x7 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सध्या भारतीय नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओला भारतीय नेटकऱ्यांची मोठी पसंती मिळत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय बनला आहे. लोकांकडून मुलांचे प्रचंड कौतुक होत आहे.
‘बाहेर पडा सर्वांनी…लंकापती रावण’ चालला भाजी विकायला! Viral Video पाहून जमिनीवर हसूनहसून लोळाल
व्हायरल व्हिडिओ
ये जापान का वीडियो है जिसमें कितना प्यार डांस
किया गया है बप्पा के गाने पर ♥️♥️
सनातन की धूम अब हर जगह होने लगी है ।
डांस तो बहुत प्यारा किया है बाद एक छोटी सी मिस्टेक है कि शूज पहनकर किया। शायद उनलोग को नहीं पता होगा।
गणपति बप्पा मोरया 🚩🙏🏻🙏🏻 pic.twitter.com/AWfE6jP3Me— Meenakshi Singh (@Meenaks06356943) August 27, 2025
जापान 🔥🔥🔥
Watch : A mesmerizing tribute!Japanese dancers perform for Ganesh Chaturthi ✨
Ganpati Bappa Morya 😇🙌🏻 #गणपति_बप्पा_मोरया #गणेश_चतुर्थी #Ganpati #GaneshUtsav #GanpatiBappaMorya pic.twitter.com/eBNpfVNBzu
— Singh’am (@Singham24x7) August 27, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल व्हिडिओ पाहून भारतीयांनी खूप आनंद व्यक्त केला आहे. अनेकांनी भारताची संस्कृतीचा अभिमान असल्याचे म्हटले आहे. जपानी मुलांच्या डान्सचेही कौतुक केले आहे. सध्या हे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. हे व्हिडिओ तुम्हालाही नक्कीच आवडतील.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.