लालबाग परळमध्ये रस्त्यावर गुजराती फलक लावल्याने वाद निर्माण झाला (फोटो - सोशल मीडिया)
महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची अर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये मराठी भाषेची समस्या काय आहे असाच प्रश्न आता निर्माण झाला आहे. मराठी भाषेच्या आग्रहासाठी आणि हिंदी भाषा सक्तीविरोधात आंदोलन करण्यात येते. मात्र तरीही मुंबई महापालिका वादाची ठिणगी टाकत असल्याचे लालबागमध्ये दिसून आले. मराठी बहुल भाग असलेल्या मुंबईच्या लालबाग परळमध्ये रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी मराठीमध्ये नाही तर गुजराती व इंग्रजी भाषेमध्ये फलक लावण्यात आले आहे.
हे देखील वाचा : “महिलांसोबत जे केलं तो विधीचाच भाग, जबरदस्ती नाही: पोलीस कोठडीत भोंदूबाबा खरातने उधळली मुक्ताफळं
मुंबई महापालिकेच्या ठेकेदाराकडून पुलाचे काम केले जात आहे. अपघात टाळण्यासाठी या ठिकाणी काही फलक लावण्यात आले. मात्र या फलकावर मराठी ऐवजी चक्क गुजराती आणि इंग्लिश भाषेचा वापर करणत आलाय. याचे फोटो आणि व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामुळे नवीन वादाला तोंड फुटले.
हे देखील वाचा : चंडीगडमध्ये रहस्यमय घटना! रस्त्यावर दिसला झोम्बी डिलिव्हरी बॉय; दीड एकाच जागेवर उभा, VIDEO ने उडवली झोप
लालबाग परळीमधील या प्रकारानंतर शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखाप्रमुख मिनार नाटाळकर यांनी या संदर्भात घटनास्थळी जाऊन जाब विचारत आक्रमक पवित्रा घेतला. सोशल मीडिया पोस्टमध्ये नाटाळकर म्हणाले की, ‘बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) पूल विभागतर्फे परळ येथील उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. तेथील ठेकेदाराने गुजराती भाषेत एक फलक लावलेला निदर्शनास आला. त्वरित संबंधित व्यक्तीला बोलवून तो त्वरित काढून टाकण्यात आला व मराठीमध्ये फलक लावण्याचे सांगण्यात आले.’ दरम्यान या घटनेमुळे स्थानिकांमध्ये देखील रोष उमटल्याचे बघायला मिळाले आहे. शिवाय आता पुढे या प्रकरणी नेमकी काय कारवाई होते, आणि पुढे असे प्रकार महाराष्ट्रात घडू नयेत यासाठी प्रशासन काय खबरदारी घेतं, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.






