(फोटो सौजन्य: Instagram)
काय घडलं व्हिडिओत?
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मध्य प्रदेशातील ग्वालियरमध्ये घडून आली. नववधू आपल्या पतीसह प्राणीसंग्रहायल पाहायला आली होती. वधू आली तर नवऱ्यासोबत होती पण जाताना ती आपल्या प्रियकरासोबत फरार झाली. पती गाडी पार्क करायला जात आहे हे पाहून तिने संधाचा फायदा घेतला आणि अवघ्या काही सेकंदातच प्रियकराच्या गाडीवर बसून ती तिथून निघून गेली. व्हिडिओमध्ये घटनाक्रम स्पष्ट दिसून येतो. प्रियकर दुचाकीला इतक्या स्पीडमध्ये चालवतो की काही सेकंदातच गाडी दिसेनाशी होती.
हे जोडपे मध्य प्रदेशातील शिवपूरीचे रहिवासी असल्याचे समोर येत आहे. पत्नीला अचानक गायब झाल्याचे पाहून पतीने पोलिस स्थानकाला भेट दिली. तिथे हरवल्याची तक्रार त्याने दाखल केली पण खरं प्रकरण तर पुढे जाऊन उलगडलं. पत्नीचा शोध घेण्यासाठी आणि लग्नानंतर लगेचच ही घटना का व कशी घडली, हे निश्चित करण्यासाठी पोलीसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाइल लोकेशन डेटाची तपासणी करायला सुरुवात केली. या तपासात उघड झाले की, नववधू हरवली नाही तर प्रियकरासोबत पळून गेली आहे.
View this post on Instagram
ही घटना सध्या सोशल मिडियावर चांगलीच ट्रेंड करत असून @unscripted.india_ नावाच्या स्टाग्राम अकाऊंटवरुन व्हिडिओला शेअर करण्यात आले आहे. व्हिडिओवर अनेक यूजर्सने कमेंट्स करत या अजब-गजब प्रकारावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “देशात खूप तेजस्वी लोकं आहेत”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “व्वा, ही तर लेटेस्ट न्यूज आहे”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “घरातल्यांनी जबरदस्तीने लग्न लावलं की असंच घडतं”.
टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.






