(फोटो सौजन्य: Instagram)
काय घडलं व्हिडिओत?
माहितीनुसार, ही घटना उत्तर प्रदेशच्या सैफई येथील बरौली प्राथमिक शाळेत घडून आली. व्हायरल व्हिडिओमध्ये एक शिक्षक टक्कल केलेल्या विद्यार्थीच्या डोक्यावर जोरजोरात हात फिरवून तबला वाजवताना दिसून आला. यावेळी इतर विद्यार्थी हे दृष्य पाहून हसत होते. मुलांमध्ये टक्कल ही गोष्ट फार साैम्य असते, कुणाचे टक्कल पाहून इतर विद्यार्थी त्याची खिल्ली उडवतात, त्याला चिडवायला सुरुवात करतात. अशात शिक्षकांनी विद्यार्थांना समजवण्याऐवजी इथे तर शिक्षकच मुलाचे हसं करताना दिसून आले. व्हिडिओतील शिक्षकाचे नाव दिनेश कुमार माथूर असल्याचे सांगितले जात आहे.
View this post on Instagram
सांगितलं जातंय की, हा व्हिडिओ स्वत: शिक्षकाने आपल्या एक्स अकाऊंटवर शेअर केला, ज्यानंतर तो सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला. लोकांनी शाळेवर आणि शिक्षकावर टिका करायला सुरुवात केली ज्यानंतर शिक्षकावर कारवाई करत त्याचे निलंबन करण्यात आले आहे. ही घटना @onlymyhealth नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आली आहे. व्हिडिओतील कॅप्शनमध्ये घटनेची माहिती देण्यात आली असून अनेक यूजर्सने व्हिडिओवर कमेंट्स करत संबंधित प्रकारावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “निर्लज्ज माणूस आणि हा शिक्षक आहे”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ला टक्कल करायला लावले पाहिजे; त्यानंतर दुसऱ्या एखाद्या शिक्षकाने त्याला अगदी अशाच प्रकारे बसवून त्याच्या डोक्याची तशीच अवस्था केली पाहिजे… आणि हे सर्व घडत असताना संपूर्ण शाळेने ते पाहत राहावे, त्याचे ‘रील्स’ बनवावेत आणि हसावे. त्याला केवळ हीच शिक्षा मिळायला हवी”.
टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.






