क्षणातच पलटला खेळ! चालकाची एक चूक अन् 36 लोकांचा जीव मृत्यूच्या विळख्यात; बस अपघाताचा थरारक Video Viral
सोशल मीडिया एक असे प्लॅटफॉर्म आहे जिथे अनेक घटना व्हायरल होत असतात. मजेदार व्हिडिओजसह इथे बऱ्याचदा काही अपघातांचे दृश्यही शेअर केले जाते. आताही इथे अशाच एका भीषण अपघाताचा व्हिडिओ फार वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओतील भयाण दृश्यांनी आता अनेकजण थक्क झाले असून अपघाताचा हा थरार तुमच्या अंगावर काटा आणेल. घटनेत नक्की काय घडले ते सविस्तर जाणून घेऊया.
गाडी चालवताना नेहमी रस्त्यावर नीट लक्ष ठेवा आणि वाहतूक नियमांचे पालन करा असा सल्ला दिला जातो. मात्र अनेकजण याकडे दुर्लक्ष करतात आणि मग मृत्यूला बळी पडतात. आताही बसचालकाची एक चूक प्रवाशांचा बळी घेण्यास कारणीभूत ठरल्याचे दिसून आले. इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये दुचाकीस्वाराच्या एका चुकीमुळे संपूर्ण बस उलटल्याचे घटना घडून आली. यात बस अक्षरशः कोलांडी उड्या मारत उलटली जे पाहणे फार थरारक ठरले.
हा अपघात महाराष्ट्रातील कंटूर हायवेवर घडून आल्याचे सांगण्यात येत आहे. माहितीनुसार, हा घटना 3 मार्च 2025 रोजी दुपारी 1:41 च्या सुमारास घडली. वास्तविक, एक दुचाकीस्वार अचानक रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत आहे. तेवढ्यात मागून एक प्रवासी बस नेहमीच्या वेगाने येत आहे. दुचाकीस्वाराला वाचवण्यासाठी, बस चालक ब्रेक लावतो आणि उजवीकडे सरकतो. त्यामुळे बस उलटली आणि सुमारे 25 सेकंदांची ही क्लिप यासोबतच संपली. युजर्स कमेंट सेक्शनमध्ये दुचाकीस्वारावर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. या अपघातात एकूण 36 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे तर अनेकजण यात गंभीर जखमी झाले आहेत.
महाराष्ट्र के लातूर में हाइवे पर मोटरसाइकिल वाले को बचाने के चक्कर में बस पलटी..
15 से 20 यात्री घायल.
सीसीटीवी में पूरा हादसा कैद.
मोटरसाइकिल वाले की पूरी गलती नजर आ रही है.#Maharashtra pic.twitter.com/ydaOwCb0ED
— Vivek Gupta (@imvivekgupta) March 3, 2025
दरम्यान अपघाताचा हा थरार @imvivekgupta नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेविषयीची माहिती देण्यात आली आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिले असून आता अनेकांनी कमेंट्स या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “आता बसमध्ये जाणेही सेफ नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे भयानक आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.