(फोटो सौजन्य: instagram)
सोशल मीडियावर दररोज वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होतात, जे लोकांचे लक्ष वेधून घेतात. यात कधी स्टंट्स दाखवले जातात तर कधी विचित्र जुगाड तर कधी धक्कादायक अपघातांचे दृश्य. याचबरोबर इथे बऱ्याचदा प्राण्यांच्या आयुष्याशी संबंधित व्हिडिओ देखील शेअर केले जातात. आताही इथे असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. तुम्ही आजवर अनेकांना व्लॉगिंग करताना पाहिले असेल मात्र तुम्ही कधी कोणत्या प्राण्याला व्लॉगिंग करताना पाहिले आहे का? नाही तर आताच्या व्हायरल व्हिडिओतून तुम्हाला ते पाहता येणार आहे.
नुकताच इंटरनेटवर एक रंजक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक कासव कॅमेरासोबत दिसत आहे. विशेष म्हणजे हे कासव व्लॉगिंग करताना दिसत आहे, जणू तो स्वतः व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे. हे अनोखे दृश्य पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. व्हिडिओवर अनेक कमेंट येत आहेत, जिथे काही युजर्स याला “नेक्स्ट लेव्हल व्लॉगिंग” म्हणत आहेत तर काहीजण याला खूप क्यूट म्हणत आहेत.
अरे बापरे! इथे केली जाते पालींची शेती, पण कशी? भयानक दृश्ये पाहून तुम्हालाही येईल किळस; Video Viral
काय आहे व्हिडिओत?
तर व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता यात एक व्यक्ती कासवाच्या डोक्याला कॅमेरा बांधून पाण्यात सोडताना दिसत आहे. यानंतर कॅमेऱ्यात कैद झालेले दृश्य खूपच रंजक आहे. व्हिडीओ पाहून असे वाटते की तो एखाद्या व्यावसायिक व्लॉगरने रेकॉर्ड केला आहे. कासवाच्या अनोख्या कोनातून शूट केलेल्या या व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. हा अनोखा व्हिडिओ झपाट्याने व्हायरल होत आहे आणि तो पाहिल्यानंतर सगळेच हैराण झाले आहेत. व्हिडिओमध्ये, व्यक्तीने पुढे दाखवले आहे की त्याने व्हिडिओ बनवण्यासाठी कासवाला कसे प्रशिक्षण दिले आहे. हा रोमांचक व्हिडिओ आता अनेकांचे लक्ष वेधून घेत असून लोक आता ती वेगाने शेअर करत आहेत.
रेल्वे स्टेशनवरच पत्नीने पतीला केली मारहाण, एका फटक्यात उचलले आणि जमीवरच नेऊन आपटले; Video Viral
कासवाच्या व्लॉगिंगचा व्हायरल व्हिडिओ @outofmindexperiment नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर कॅप्शनमध्ये, ‘कासवावर कॅमेरा’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत अनेकांनी पाहिले असून 8 लाखाहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाइक्स दिले आहेत. तसेच काहींनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “कासव तर हेवी व्लॉगर निघाला” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “त्याला त्याचे आयुष्य जगू द्या”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.