'एक नंबर, तुझी कंबर..." की घोडयालाही मोह आवरेना; आला नि दिली कंबरड्यात लाथ; Viral Video पाहून हसूच आवरता येणार नाही
सोशल मीडिया एक असे प्लॅटफॉर्म आहे जिथे नेहमीच अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओ इतके मजेशीर असतात की ते पाहून आपल्याला हसूच आवरता येत नाही. सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असल्यास तुम्ही इथे असे हास्यास्पद व्हिडिओज बऱ्याचदा पाहिले असतील आता मात्र इथे असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यातील दृश्ये पाहून तुम्हाला तुमचे हसू आवरता येणार नाही. मागील काही काळापासून Shaky हे मराठी गाणं सोशल मीडियावर खूप ट्रेडिंग होत आहे. या गाण्यावर अनेकजण रील बनवत आहेत असाच एक रील आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओत जे घडलं त्याचा मुलीने स्वप्नातही विचार केला नसेल मात्र हा व्हिडिओ आता लोकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे.
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, यात एक मुलगी मोकळ्या जागी जिथे आपल्याला हिरवळच हिरवळ दिसत आहे अशा ठिकाणी नाचताना दिसून आली. Shaky गाण्यातील एक नंबर, तुझी कंबर या ओळी वाजत असतानाच ती आपली कंबर हलवत नाचू लागते. मात्र तिचा हा डान्स तिथे उभ्या असलेल्या घोड्याला फारसा आवडत नाही. मुलगी नाचायला लागते तितक्यातच घोडा धावत पळत तिच्याकडे येतो आणि एका क्षणातच तिच्या कंबरेवर लाथ मारतो. मुलीला काही कळेल याआधीच ती जोरदार खाली पडते आणि इथेच व्हिडिओचा शेवट होतो. तिला बसलेली घोड्याची लाथ ही दुःखद बाब असली तरी ज्याप्रकारे तिला ही लाथ पडते ते पाहून सर्वांनाच हसू अनावर होते. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर वेगाने शेअर केला जात असून लोक या व्हिडिओची चांगलीच मजा लुटत आहे.
दरम्यान हा व्हायरल व्हिडिओ @official_abhinav नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ही घटना नेपाळमधली असल्याचे सांगण्यात आले आहे. व्हिडिओला लाखो लोकांनी पाहिले असून अनेकांनी व्हिडिओला लाइक्स देखील दिले आहेत तर अनेक युजर्सने व्हिडिओवर कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “घोडेही रील बनवणाऱ्यांना कंटाळले आहेत” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “कंबरेवरच एक नंबर लाथ मारली”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.