(फोटो सौजन्य: X)
सोशल एक अशी दुनिया आहे जिथे तुम्हाला अनेक अनोख्या गोष्टी दिसून येतील. इथे धोकादायक स्टंट्स, युनिक जुगाड, अपघाताचे भीषण दृश्य अशा अनेक गोष्टी शेअर केल्या जातात. यातच इथे बऱ्याचदा प्राण्यांचे व्हिडिओही शेअर होतात ज्यांना लोक फार मजा घेऊन पाहतात. जंगलातील आयुष्य मानवाच्या आयुष्याहून बरेच वेगळे असते, इथे जगण्यासाठी प्राण्यांना नेहमीच संघर्ष करावा लागतो अशात शिकारीचे तर अनेक व्हिडिओ तुम्ही आजवर सोशल मीडियावर शेअर केलेले पाहिले असतील मात्र आता जो व्हिडिओ इथे व्हायरल झाला आहे जो तुमच्या कल्पनेपलीकडचा ठरणार आहे. यात जंगलाचा शिकारी आणि जंगलाची राणी यांच्यातील एक अनोखे आणि प्रेमळ नाते दिसून आले जे आजवर कुणीही पाहिले नाही. चला व्हिडिओत नक्की काय घडलं ते जाणून घेऊया.
काय दिसलं व्हिडिओत?
सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये जंगलातील हे दुर्मिळ दृश्य दिसून आले. व्हिडिओमध्ये दिसतंय की एक वाघ पाण्यात बसून विश्रांती घेत होता, तेवढ्यात मागून एक सिंहीण येते. दोघांनी एकमेकांना पाहताच, दोघेही वेगाने पुढे सरकले. पाहणाऱ्यांना वाटलं की आता जोरदार लढाई होईल, कारण जंगलात सिंह आणि वाघ हे एकमेकांचे शत्रू मानले जातात. पण पुढच्याच क्षणी एक आश्चर्यकारक दृश्य दिसून आलं ज्याने सर्वांनाच थक्क करून सोडलं.
व्हिडिओमध्ये, सिंह आणि वाघ एकमेकांना पाहताच खुश होतात आणि पळत जाऊन एकमेकांना घट्ट मिठी मारतात. दोघेही एकमेकांना स्पर्श करतात आणि प्रेमळ नजरने एकमेकांकडे पाहत राहतात. सिंह आणि वाघांमधील हे प्रेमाचे नाते जंगलाचे नियम मोडताना दिसत आहेत. नेहमीच एकमेकांच्या विरोधात मानले जाणारे सिंह आणि वाघाची ही गळाभेट कोणत्या चमत्काराहून कमी नाही. हे दृश्य दाखवून देते की, निसर्गात अनेक वेळा अशा गोष्टी घडतात ज्या आपल्या कल्पनेच्या पलीकडे असतात.
Does your husband know you flirting with a tiger? 😂 pic.twitter.com/CCeZmVyy9X
— The Figen (@TheFigen_) June 11, 2025
Fact Check: विमान कोसळतानाचा ‘तो’ व्हिडिओ खरा की खोटा? अहमदाबाद दुर्घटनेनंतर होतोय व्हायरल
वाघ-सिंहाचा हा व्हायरल व्हिडिओ @TheFigen_ नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत 4 मिलियनहून अधिक लोकांनी पाहिले आहे तर हजारो लोकांनी व्हिडिओला लाइक्स दिले आहेत. यासहच अनेकांनी व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये या सिंह आणि वाघाच्या या प्रेमळ नात्यावर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “तो फ्लर्टिंग करत आहे का?” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ते काही गोंडस लायगरांची पैदास करतील! आम्हाला त्यापैकी काही ओक्लाहोमामध्ये मिळाले”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.