Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रोबोट आला VVIP पाहुणा बनून! बाउन्सर्सच्या सुरक्षेत केलं सँडविच दुकानाचं उद्घाटन; Video Viral

Robot Viral Video : काय सांगता.... सँडविच दुकानाच्या उद्घाटनाला नेते किंवा सेलेब्रिटी नाही तर चक्क रोबोटला निमंत्रण देण्यात आलं. हटके अंदाजात त्याने दुकानात एंट्री घेतली आणि डान्स करतच लोकांचे केले मनोरंजन.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 26, 2026 | 09:18 AM
रोबोट आला VVIP पाहुणा बनून! बाउन्सर्सच्या सुरक्षेत केलं सँडविच दुकानाचं उद्घाटन; Video Viral

रोबोट आला VVIP पाहुणा बनून! बाउन्सर्सच्या सुरक्षेत केलं सँडविच दुकानाचं उद्घाटन; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • उज्जैनमध्ये रोबोटची VVIP पाहुणा म्हणून एंट्री
  • बाउन्सर्सच्या सुरक्षेत रोबोटचा जल्लोषात डान्स
  • भारतीय परंपरा अन् आधुनिक तंत्रज्ञानाचा अनोखा संगम
मागील काही वर्षांपासून जगभरात रोबोट्सचे प्रमाण फार वाढले आहे. पूर्वी अवाक् करणारे हे तंत्रज्ञान आता मात्र लोकांसाठी फार सामान्य होऊन गेले आहे. रोबोट्स आता फक्त घरकामांमध्ये मानवाची मदत करत नाही तर इतरही अनेक गोष्टींमध्ये भाग घेतो. सोशल मिडियावर यासंदर्भात असंख्य व्हिडिओज आतापर्यंत व्हायरल झाले आहेत ज्यात रोबोट कधी डान्स करताना दिसतो तर कधी मिठाई वाटताना दिसतो. अलिकडे मात्र एका सॅंडविच दुकानाचं उद्घाटनाला रोबोटने विशेष अतिथी म्हणून उपस्थिती लावल्याचे दिसून आले. रोबोटचे थाटामाटात स्वागत करण्यात आले, त्याने डान्स केला आणि उत्साहात हा सोहळा पार पडला. ही घटना सध्या सोशल मिडियावर आता शेअर करण्यात आली असून रोबोटच्या या व्हिडिओला यूजर्सचे चांगले व्हूज देखील मिळाले आहेत. चला यात काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

फुकट मिळतंय मग काय! हायवेवर फेकलेल्या एक्सपायर्ड चॉकोलेट्सवर नागरिकांचा डल्ला; VIDEO तुफान व्हायरल

काय घडलं व्हिडिओत?

सदर व्हिडिओ हा धार्मिक आणि सांस्कृतील स्थळ उज्जैन येथून समोर येत आहे. सामान्यत: कोणत्याही नवीन दुकानाच्या उद्घाटनासाठी मोठे नेते, अभिनेते किंवा शहरातील प्रमुख व्यक्ती यांना आमंत्रित केले जाते. पण व्हिडिओत मात्र विशेष अतिथी म्हणून रोबोटची हजेरी दिसून आली. एका सँडविच दुकानाच्या उद्घाटनासाठी मालकाने रोबोटला VIP गेस्टचा मान दिला होता. रोबोटनेही हे निमंत्रण स्वीकारले आणि दुकानाच्या उद्घाटनाला त्याने हजेरी लावली.

व्हिडिओमध्ये दोन बाउन्सर्ससोबत रोबोट दुकानाबाहेर एंट्री घेताना दिसतो. त्याच्या स्वागतासाठी लोक जमा झाली होती. अशात रोबोट येताच त्याच्या दुकान मालकांनी दुकानदारांनी पारंपरिक टिळा लावून रोबोटचे स्वागत केले. नंतर त्याच्या गळ्यात लाल रंगाचा स्कार्फ घालण्यात आला. रोबोटने सर्वांसोबत डान्स केला. त्याचा जबरदस्त डान्स इतका प्रभावी होता की उपस्थित सर्वच ते पाहून खुश झाले. दुकानाच्या आत गेल्यानंतर मालकाने रोबोटला सँडविच दाखवल्याचे दिसले. रोबोट सँडविच खाऊ शकत नाही पण तो सँडविच कसा दिसतोय हे मात्र तो नक्कीच पाहू शकतो. संपूर्ण सोहळ्यादरम्यान फक्त रोबोटची उपस्थिती खास ठरली नाही तर भारतीय परंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा एक अनोखा संगमही पाहायला मिळाला.

Inauguration of sandwich shop, Ujjain Madhya Pradesh pic.twitter.com/D5658yA30s — NiLAY 📸 (@NilayPhotos) August 23, 2026

८ वर्ष नवऱ्याच्या खिशातून लंपास केले १२ लाख, पण उंदरांनी केला पत्नीच्या ‘मायक्रो-प्लॅनिंग’चा चुराडा; घटनेचा Video Viral

हा व्हिडिओ @NilayPhotos नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला लाखो व्हूज मिळाले असून यूजर्सने कमेंट सेक्शनमध्ये या घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “व्यावसायिक (कार्यक्रम) चौकशीसाठी, हा रोबोट कसा मिळवता येईल, हे कोणाला माहित आहे का?”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “लवकरच ते वेटर आणि आचाऱ्यांच्या जागी रोबोट्स आणतील. माणसे स्वतःलाच अनावश्यक ठरवतील…”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “भ्रष्टाचारी लोकांना बोलवण्यापेक्षा हे कितीतरी पटींनी चांगलं आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही. 

Web Title: Humanoid robot vvip entry bouncers sandwich shop inauguration ujjain mahakal bhajan viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2026 | 09:18 AM

Topics:  

  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

फुकट मिळतंय मग काय! हायवेवर फेकलेल्या एक्सपायर्ड चॉकोलेट्सवर नागरिकांचा डल्ला; VIDEO तुफान व्हायरल
1

फुकट मिळतंय मग काय! हायवेवर फेकलेल्या एक्सपायर्ड चॉकोलेट्सवर नागरिकांचा डल्ला; VIDEO तुफान व्हायरल

८ वर्ष नवऱ्याच्या खिशातून लंपास केले १२ लाख, पण उंदरांनी केला पत्नीच्या ‘मायक्रो-प्लॅनिंग’चा चुराडा; घटनेचा Video Viral
2

८ वर्ष नवऱ्याच्या खिशातून लंपास केले १२ लाख, पण उंदरांनी केला पत्नीच्या ‘मायक्रो-प्लॅनिंग’चा चुराडा; घटनेचा Video Viral

Fact Check : काय सांगता! फ्लायओव्हरच्या पिलरवर वसलं संपूर्ण कुटुंब? VIDEO पाहून यूजर्सना बसला धक्का
3

Fact Check : काय सांगता! फ्लायओव्हरच्या पिलरवर वसलं संपूर्ण कुटुंब? VIDEO पाहून यूजर्सना बसला धक्का

Raksha Bandhan Viral Video: फाटलेले कपडे लोकांच्या नजरेत वेडा, पण बहिणीने राखी बांधताच भावाने जे केलं, ते पाहून डोळे पाणावतील
4

Raksha Bandhan Viral Video: फाटलेले कपडे लोकांच्या नजरेत वेडा, पण बहिणीने राखी बांधताच भावाने जे केलं, ते पाहून डोळे पाणावतील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.