“हमें तो लुटा OLA UBER ने, Rapido में कहा दम था, हमें जहाँ भेजा वहाँ... रिक्षावरची पुणेरी पाटी होत आहे Viral
पुणे महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक शहर आहे. पुण्यात अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. पुण्याला शिक्षणाचे माहेरघर असे म्हटले जाते. येथील अनेक गोष्टी देशभर प्रसिद्ध आहेत यातीलच एक गोष्ट म्हणजे पुणेरी पाट्या. पुणे आणि तेथील पुणेरी पाट्या यांची देशभर चर्चा असते. अनेकदा या पाट्यांवरील गमतीदार संदेश वाचून पोट धरून हसायला येते. पुण्याच्या या पाट्या अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या अशीच एक पुण्याची मजेदार पाटी व्हायरल होत आहे. यावरील संदेश वाचून आता युजर्स हास्याने लोटपोट होत आहेत.
सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. यातील अनेक व्हिडिओ कधी आपल्याला थक्क करून जातात तर काही व्हिडिओ हास्याने लोटपोट करतात. अनेकदा यात पुण्यातील काही व्हिडिओजचादेखील समावेश असतो. सध्या आणखीन एक पुण्यातील व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होताना दिसून येत आहे.
हेदेखील वाचा – “गॅस काय तुझा बाप देतो?” राइड कॅन्सल करताच रिक्षावाल्याला राग अनावर, तरुणीला कानशिलात लगावले, Video Viral
तर पुण्यातील एका रस्त्यावर एक रिक्षा उभी आहे. या रिक्षाच्या मागच्या बाजूस एक पाटी आहे ज्यावर एक मजेदार संदेश लिहिण्यात आला आहे. यावर लिहिले आहे की,
“हमें तो लुटा OLA UBER ने
Rapido में कहा दम था
हमें जहाँ भेजा वहाँ का
भाडा ही कम था..
– पुणेरी पाटी
आता रिक्षावर लिहिलेला हा अतरंगी संदेश वाचून अनेकांना हसू अनावर झाले आहे. ऑटो चालकाने या पाटीवरून त्याची व्यथा मांडली असल्याचे या व्हिडिओतून दिसून येत आहे. त्याने यातून त्याचे दु:ख व्यक्त केले आहे. रिक्षावरील या हटके पाटीचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेक लोक या व्हिडिओची मजा लुटत आहेत.
हेदेखील वाचा – गणपतीसाठी बॉस सुट्टी देत नाहीये? मग वापरा ही ट्रिक, तरुणीचा Video होतोय Viral
हा व्हिडिओ @sopp_navh_may नावाच्या इंस्टग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, हे रिक्षावाल्याचे खरे दुःख, सलाम तुला भावा असे लिहिण्यात आले आहे. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “मी ही रिक्षा पाहिली आहे पुण्यात” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, , “शंभर टक्के खरंय.”