गणेशोत्सव आता अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपला आहे, त्यामुळे अनेक नोकरदार लोकांना आता गावी जाण्याची आस लागून राहिली आहे. अनेकांच्या गावी जाण्याच्या तयारीला आता सुरुवात झाली आहे. प्रत्येकजण बाप्पाची आतुरतेने वाट बघत आहेत. सर्वांची गणपतीची तयारी सुरु असते तर काहीजण आपल्या सुट्टीची चिंता करत बसलेले असतात. नोकरदार लोकांसाठी आपल्या बॉसकडून सुट्टी मागणे म्हणजे कोणत्या युद्धाला जाण्याइतके कठीण काम असते. एकवेळ देव खाली येईल पण बॉस काय सुट्टी देणार नाही. अशात सुट्टीसाठीचा एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर फार व्हायरल होत आहे.
एका तरुणीने आपल्या अकाउंटवर सुट्टीसंबंधीचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल होत असून अनेकांना आता हा व्हिडिओ फार आवडला आहे. सुट्टी मिळवण्यासाठी लोकांच्या मनात कोणकोणते विचार येऊ शकतात आणि सुट्टी मिळवण्यासाठी नक्की काय करावे… हे यात व्हिडिओत सांगण्यात आले आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला सुट्टी मिळेल की नाही ते सांगता येणार नाही मात्र तुम्ही पोट धरून हसाल एवढे निश्चित…
हेदेखील वाचा – धक्कादायक! भरधाव वेगाने कार आली अन् भिंत तोडून घरात घुसली, धडकी भरवणारा Video Viral
हा व्हायरल व्हिडिओ @ritika_shigvan नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, प्रतेकी कोकणी माणसाच शेवटच निर्णय असे लिहिण्यात आले आहे. किंबहूना पुण्या मुंबई पेक्षा अधिक मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा केला जातो. त्यामुळेच कोकणी माणसाला या काळात आपल्या गावाची ओढ लागते. अनेकदा बॉस सुट्टी देण्यास नकार देतो अशात कोकणी माणसाच्या मनात नक्की कोणते विचार येतात, याचे गमतीदार उदाहरण या व्हिडिओतून दाखवण्यात आले आहे.
हेदेखील वाचा – “गॅस काय तुझा बाप देतो?” राइड कॅन्सल करताच रिक्षावाल्याला राग अनावर, तरुणीला कानशिलात लगावले, Video Viral
या व्हायरल व्हिडिओतील कमेंट्स खरं तर फार लक्षणीय ठरत आहेत. अशा मजेशीर कमेंट्स तुम्ही मुळातच वाचल्या असाव्यात. अनेक लोकांनी यावर कमेंट्स करत आपले मत यावर व्यक्त केले. एका युजरने लिहिले, “तु आकाश पाताळ एक कर पण गणपती ला गावाला येच काहिपण करुन” तर दुसऱ्या युजरने लिहिले, “तुम्ही सर्व लाडकी बहिन आहात तुम्हला कोण कामावरून काढ़नार आहे …..बाईईईईई”.