शुल्लक वादात पतीला आला राग; पत्नीला थेट बाल्कनीच्या रोलिंगवर जाऊन लटकावले, दृश्य पाहूनच थरकाप उडेल; Video Viral
पती-पत्नीच्या नात्यात वाद-भांडण होणे फार सामान्य आहे. अनेकदा रागाच्या भरात आपले नियंत्रण सुटते आणि आपण नको ते करून बसतो. मात्र आता तर हद्दच पार झाली, एका शुल्लक वादावरून पती इतका जास्त भडकला त्याने आपल्या पत्नीला थेट बाल्कनीच्या रोलिंगवर जाऊन लटकावले. ही घटना फार धक्कादायक तसेच गंभीर आहे, वाद कोणत्याही गोष्टीवरून जरी असला तरी पतीचे हे कृत्य घृणास्पद आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून लोक आता यावर आपला संताप व्यक्त करत आहेत. व्हिडिओतील दृश्ये इतकी थरारक आहेत की ती तुमच्या अंगावर काटा आणू शकतात. चला तर मग नक्की काय घडले याविषयी जरा सविस्तर जाणून घेऊया.
काय आहे प्रकरण?
उत्तराखंडमधील ऋषिकेशमध्ये ही घटना घडून आल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना काही साधीसुधी नसून एक चिंतेचा विषय आहे. पती-पत्नीतील वाद इतके मोठे आणि भयानक वळण घेतो की त्यातून सुटणे पत्नीला अशक्य होऊन बसते. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात, एक बिल्डिंग दिसून येत आहे आणि यातच तुम्हाला एका महिला बाल्कनीच्या रोलिंगवर लटकल्याचे दिसून येईल. क्लिपमध्ये लोकांच्या मोठ्याने ओरडण्याचा आवाजही येत आहे मात्र याकडे दुर्लक्ष करून, पती आपल्या पत्नीला शेवटपर्यंत रोलींगवर लटकवून ठेवतो आणि इथेच या व्हिडिओचा शेवट होतो. घटनेबाबतची अधिक माहिती अद्याप मिळालेली नसून पतीचे हे कृत्य मात्र सोशल मीडियावर एक चर्चेचा विषय ठरत आहे. ३१ सेकंदांचा हा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल होत असून लोकांनी या घटनेचा त्रासदायक म्हटले आहे तर परिस्थिती कितीही वाईट झाली असली तरी, अशी परिस्थिती नात्यात येणे ही लज्जास्पद गोष्ट आहे असे लोकांचे म्हणणे आहे.
Shocking: Husband hangs wife from railing, Uttarakhand
pic.twitter.com/mEJ0J6KSq0— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) June 7, 2025
पांचट जोक्स: नवरा की बायकोचा कुत्रा? वाचा जरूर
हा व्हायरल व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘उत्तराखंडमध्ये पतीने पत्नीला रेलिंगवरून लटकवले’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले असून हजारो युजर्सने यावर कमेंट्स करत घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “लग्न न करण्यासाठी आणखी एक कारण सापडलं” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मला आशा आहे की हा माणूस खून करण्याचा प्रयत्न आणि घरगुती हिंसाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात सडेल”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.