रोजच्या व्यापातून थोडा वेळ काढत काही मजेदार जोक्स वाचा आणि चेहऱ्यावर हसू आणा! तुम्हाला, आम्हाला, सर्वांना आवडणारे काही पांचट जोक्स जे तुम्हाला खळखळून हसवतील.
एक मुलगा लग्नासाठी पुण्यात मुलगी पाहायला जातो
मुलगा – मला की नाय काटकसर करणारी मुलगी हवी आहे
मुलगी – मी तर साखरेच्या बिस्किटांवरून साखर काढून चहात टाकते
नवरा – माझ्या छातीत खूप दुखतंय, ताबडतोब अँब्युलंसला फोन लाव
बायको – हो, तुमच्या फोनचा पासवर्ड सांगा बरं
नवरा – नको नको राहू देत, आता जर बरं वाटतंय
बायको – तुम्ही मला लग्नाआधी चित्रपट, सारसबाग… कुठे कुठे फिरायला घेऊन जायचात आणि आता मात्र मला कुठेच घेऊन जात नाही
नवरा- अगं निवडणूक झाल्यावर तू कधी निवडणुकीचा प्रचार केलेला पाहिला आहे का?
दुकानदार : बोला काय देऊ ?
नवरा : माझ्या बायकोच्या कुत्र्यासाठी एक केकद्या
दुकानदार : इथेच खाताय की पॅक करून देऊ?
बायकोः माझी एक अट आहे !
नवरा : काय?
बायकोः तूम्ही सोडायला आले तरंच मी माहेरी जाणार
नवराः माझी पण एक अट आहे?
बायकोः काय?
नवराः मी घ्यायला आलो तरच परत यायचे
बायको – शेजारच्या शीलाचे पती बघा शीलाला महिन्यातून दहा दिवस तिला कुठे ना कुठे फिरायला घेऊन जातात, तुम्ही कधी कुठे घेऊन जाता का?
नवरा – हो, मी 4-5 वेळा विचारले होते पण ती तयारच झाली नाही
बायको: माझ्या आईचं ऐकून तुम्हाला नकार दिला असता ना तर बरं झालं असतं
नवराः काय सांगतेस ! तुझ्या आईचा विरोध होता आपल्या लग्नाला?
बायको: हो
नवराः अरे देवा, मी त्या माऊलीला उगाचच वाईट समजत होतो
नवराः काल रात्री माझ्या स्वप्नात एक सुंदर मुलगी आली होती
बायको: एकटीच आली असेल?
नवराः हो तुला कसं माहीत?
बायको: कारण तिचा नवरा माझ्या स्वप्नात आला होता