(फोटो सौजन्य: Instagram)
सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. इथे अनेकदा असे व्हिडिओ शेअर केले जातात जे पाहून आपल्या अंगावर काटा येईल. आताही असाच अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओतील दृश्ये इतके भयानक आहेत की तुम्ही त्यांचा कधी स्वप्नातही विचार केला नसावा. ही दृश्ये इतकी थरारक आहेत की ती पाहून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय येणार नाही.
वास्तविक, सर्वात धोकादायक प्राण्यांमध्ये सापाचा समावेश होतो, त्याचे विष इतके घातक असते की एका क्षणात ते कुणालाही मृत्यूच्या घरी पाठवण्याची ताकद ठेवते अशात सापाच्या वाटेल जाण्याची चुकी कुणीही करत नाही परंतु आता जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्यात एक चिमुकली चक्क सापांच्या अख्ख्या ग्रुपला घेऊन चक्क एका सुटकेसमध्ये झोपल्याचे दिसून येते. हे दृश्य इतके भयानक वाटते की ज्याने ते पाहिले तो घाबरल्याशिवाय राहिला नाही. चला व्हिडिओत नक्की काय काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय घडले व्हिडिओत?
मुलीचे नाव एरियाना असल्याचे सांगितले जात आहे आणि ती केवळ बॉल पायथॉन प्रजातीच्या अजगरांसोबत राहते. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, यात एक काळ्या रंगाची सुटकेस दिसून येते. यानंतर पुढच्याच क्षणी ही सुटकेस उघडण्यात येते ज्यांनंतर त्यातील दृश्ये पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. या सुटकेसमध्ये एक चिमुकली झोपल्याचे दिसून येते मात्र ती एकटी यात नसते तर यावेळी तिच्यासोबत सापांच्या एक मोठा ग्रुप तिला खिळून यात झोपल्याचे दिसते. चिमुकलीने सापांना आपल्या कुशीत घेतलेले असते आणि तिच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य असते. आश्चर्याची बाब म्हणजे, यावेळी तिच्या चेहऱ्यावर भीतीची एकही रेघ दिसून येत नाही. चिमुकलीचा हा स्वॅग पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो तसेच काही तिच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित करतात.
पांचट जोक्स: नवरा की बायकोचा कुत्रा? वाचा जरूर
हा व्हायरल व्हिडिओ @snakemasterexotics नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारो युजर्सने पाहिले असून अनेक युजर्सने यावर कमेंट्स करत व्हिडिओतील या दृश्यांवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “खूप आवडले” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे सुरक्षित नाही” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “तिच्या पालकांचे डोके तपासण्याची गरज आहे. साप सुरक्षित नाहीत”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.