(फोटो सौजन्य: X)
काय घडलं व्हिडिओत?
कोणत्याही नात्यात विश्वास फार महत्त्वाचा असतो आणि या विश्वासाला जर तडा लागला तर नातं तुटायला सुरुवात होते. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गढा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शारदा चौक येथील हॉटेल बॅलन्सिंग रॉक येथे घडली. महिलेला आधीपासून पतीवर संशय होता आणि या संशयाच्या जोरावर तिने पतीचा पर्दाफाश केला. पत्नीने गुपचूप पतीच्या फोनमधून हाॅटेल्सची सर्व डिटेल्स काढली आणि ती थेट हाॅटेलमध्ये दाखल झाली. इथे पतीला दुसऱ्या पत्नीसोबत बेडवर पाहताच पत्नीचा संताप आणखी वाढला आणि तिने दोघांनाही मारहाण करण्यास सुरुवात केली. पत्नीसोबत आलेल्या एका व्यक्तीने हा सर्व प्रकार आपल्या फोनच्या कॅमेरात कैद केला. सांगितले जात आहे की, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी हाॅटेलमध्ये दाखल होत तिघांचीही समजूत काढली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, जर पत्नीने पतीविरोधात तक्रार दाखल केली तर कायद्यानुसार कारवाई केली जाईल.
जबलपुर के एक होटल में पत्नी ने अपने प्रियतम को होटल के कमरा नम्बर 103 में रंगेहाथ पकड़ा..फिर हुआ जमकर तांडव…! https://t.co/PGdX5V5U1f — Ajit Singh Nokha (@ajits_rathore) October 5, 2026
या घटनेचा व्हिडिओ @ajits_rathore नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आली आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘जबलपूरमधील एका हॉटेलमध्ये पत्नीने तिच्या प्रियकराला हॉटेलच्या खोली क्रमांक १०३ मध्ये रंगेहाथ पकडले… त्यानंतर मोठा गदारोळ झाला…!’. व्हिडिओवर अनेक यूजर्सने कमेंट्स करत यातील दृष्यांवर आपले मत व्यक्त केले आहे. यात एका यूजरने म्हटले की, “खूप चांगलं केलं, अशा पतीसोबत असंच व्हायला हवं”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आजकालच्या नात्यात विश्वास राहिला नाही”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “पत्नीने पतीला खूप छान हेड शाॅट दिला”.
टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.






