(फोटो सौजन्य: X)
Viral Video: मुंबईतील रेल्वे स्टॉलवर उंदरांचा सुळसुळाट! VIDEO समोर येताच पश्चिम रेल्वेची कारवाई
अलिकडेच आंध्र प्रदेशातील अनंतपुर जिल्ह्यातील भैरव नगरमधील रहिवाशी कुमार हाल यांच्यासोबत जीवघेणी घटना मृत्यूच्या उंबरठ्यावर येऊन परतली. अपघातात त्यांचा जीव जाणारच होता तितक्यात एका पोलिस अधिकाऱ्याने यात हस्तक्षेप केला आणि मृत्यूच्या दाढेतून व्यक्तीचा जीव वाचवला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मिडियावर शेअर करण्यात आले आहे ज्यात आपण घटनेचा तपशील पाहू शकतो. व्हिडिओत रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरु झाल्याचे दिसते आणि यातच एक व्यक्ती धावत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न करताना दिसतो. रेल्वे आधीच सुरु झाली असल्याने ती काही सेकंदातच वेग पकडते आणि व्यक्ती रेल्वेसोबत प्लॅटफाॅर्मवर घरंगळत पुढे ओढला जातो. एक क्षण असा येतो की तो रेल्वे आणि प्लॅटफाॅर्मच्या फटीत पडणारच असतो तितक्यात पोलिस अधिकारी धावत येऊन त्याला खेचत मागे ओढतो. या घटनेमुळे आजूबाजूच्या लोकांच्याही अंगावर काटा येतो.
సీసీటీవీ ఫుటేజ్ కదిలే రైలు ఎక్కబోయి జారిపడిన వ్యక్తి వెంటనే అప్రమత్తమై అతన్ని కాపాడిన ట్రాఫిక్ కానిస్టేబుల్ అనంతపూర్ రైల్వే స్టేషన్లో గత నెల 29వ తేదీన కదులుతున్న రైలు ఎక్కి జారిపడిన భైరవ నగర్ ప్రాంతానికి చెందిన రవి కుమార్ అనే వ్యక్తి వెంటనే అప్రమత్తమై చొక్కా పట్టుకుని లాగి అతని ప్రాణాలు కాపాడిన ట్రాఫిక్ కానిస్టేబుల్ — Telugu Scribe (@TeluguScribe) October 3, 2026
वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल सुरेंद्र यांनी प्रसंगावधान दाखवत कुमारचे प्राण वाचवले. घटनेतून सावरल्यानंतर कुमार लगेच कॉन्स्टेबलच्या पाया पडत त्याचे आभार मानतो. घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे कॉन्स्टेबल सुरेंद्रचे आता भरभरुन काैतुक केले जात असून व्हिडिओ इंटरनेटवर सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे. दरम्यान धावत्या रेल्वेतून उतरणे किंवा चढणे आपल्यासाठी धोकादायक ठरत असून कितीही विलंब होत असला तरी असे प्रकार करणे टाळायला हवे. लक्षात घ्या, तुमची एक चूक तुमचा जीव घेऊ शकते अशात घाई न करता सुरक्षित प्रवासाला प्राधान्य द्या.
टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.






