lioness frightened by the dog's barking video goes viral
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ पाहायला मिळतात, तर कधी भयावह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये तुम्ही प्राण्यांचे देखील व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिले असतील. यामध्ये काही हैराण करुन सोडणारे व्हिडिओ पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडिओ हैराण करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
जंगलात पाहिले तर सिंहाचे-सिंहीणीचे तसेच वाघाचे-वाघीणीचे राज्य असते. या मोठ्या मांजरींची एक वेगळीच दहशत असते. हे प्राणी शिकारीसाठी बाहेर पडताच सर्वत्र एक वेगळी शांतता पसरते. सगळेजण जीव वाचवण्यासाठी पळू-लागतात. अनेजण सिंहाचे नाव ऐकूनही थरथर कापायला लागतो. पण तुम्ही कधी या प्राण्यांना त्यांच्यापेक्षा छोट्यांना घाबरताना पाहिले आहे का? एका सिंहणींला कुत्र्याला घाबरताना पाहिले आहे का? ऐकून हैराण झाला ना. पण असे घडले आहे. एक सिंहणी कुत्र्याने भुकंताच बिथरली आहे. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एक सिंहणी कुत्र्याची शिकार करायला जाते, पण कुत्रा तिच्यावर जोरजोरात भुंकायला लागतो. यामुळे सिंहणी काही वेळ त्याच्याकडे पाहते आणि तिथून पळून जाते. सध्या या दृश्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेकजण हैराण झाले आहेत.
चल हट बे शेर होगा अपने घर में !
हम प्रशासन से भी नहीं डरते 🤣 pic.twitter.com/IC79h7ldF6— Sunil Dutt (@itssunildutt) August 26, 2025
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहे. अनेकांनी हा व्हिडिओ पाहून आश्चर्य व्यक्त केले आहे. तसेच मजेशीर प्रतिक्रियाही दिली आहे. एका युजरने डॉगेश भांऊशी पंगा नाही घ्यायचा सिंहणी ताई असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका युजरने जंगालाची रणी तु असशील, पण मी इथला राजा आहे असे म्हटले आहे, तिसऱ्या एकाने आज काल डॉगेश भाऊंचा दबदबा वाढतच चालला आहे, असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ नेमका कुठला आहे हे कळाले नाही. पण व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.