विमानात लिथियम बॅटरीचा स्फोट (Photo Credit- X)
बीजिंग/शांघाय: एका प्रवाशाच्या बॅगमधील लिथियम बॅटरीला आग लागल्याने चीनमधील एका फ्लाइटमध्ये मोठी खळबळ माजली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. ही घटना चीनमधील हांग्झूहून सोलला जाणाऱ्या एअर चायना फ्लाइट CA139 मध्ये १८ ऑक्टोबर रोजी सकाळी घडली.
विमान सकाळी ९:४७ वाजता निघाले होते. दरम्यान, विमानातील वरच्या बाजूच्या सामानाच्या डब्यातून अचानक धूर आणि ज्वाळा निघू लागल्या. एका प्रवाशाच्या कॅरी-ऑन बॅगमधील लिथियम बॅटरीला आग लागल्याचे स्पष्ट झाले. आग लागल्याचे पाहताच प्रवाशांमध्ये मोठी घबराट पसरली आणि ते ओरडत पळू लागले. विमान परिचारिकांनी (Cabin Crew) तातडीने परिस्थिती नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला आणि अग्निशामक यंत्रांच्या मदतीने आग विझवली. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी विमानाला तातडीने शांघाय पुडोंग विमानतळावर आपत्कालीन लँडिंग (Emergency Landing) करावे लागले.
Today, an Air China flight (CA139) from Hangzhou to Incheon was forced to make an emergency landing in Shanghai, China, after a lithium battery in a passenger’s overhead bag caught fire. pic.twitter.com/emRolEYbmj — Weather Monitor (@WeatherMonitors) October 18, 2025
काही प्रवाशांनी त्यांच्या मोबाईल फोनवर हा भयानक क्षण रेकॉर्ड केला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये बॅगमधून धुराचे लोट आणि ज्वाळा निघत असल्याचे, विमानाचे केबिन धुराने भरल्याचे आणि क्रू मेंबर्स आग विझवण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. एअर चायनाने अधिकृत निवेदन जारी करून सांगितले की, या घटनेत कोणीही जखमी झाले नाही आणि विमान सुरक्षितपणे उतरवण्यात आले. त्यानंतर प्रवाशांना दुसऱ्या विमानाने त्यांच्या गंतव्यस्थानावर पाठवण्यात आले.
या घटनेमुळे विमान कंपन्या लिथियम बॅटरीबाबत इतके कठोर नियम का ठेवतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. लिथियम बॅटरीमध्ये अत्यधिक उष्णता निर्माण करण्याची क्षमता असते, ज्यामुळे उड्डाणादरम्यान आग लागण्याचा मोठा धोका असतो.
भारताच्या नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) लिथियम बॅटरी आणि पॉवर बँकच्या सुरक्षिततेसाठी कठोर मार्गदर्शक तत्त्वे लागू केली आहेत:
या नियमांचे पालन करणे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.