Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nepal Mother Save Daughter Video: फक्त 2 सेकंदांचा फरक अन् मोठा अनर्थ! नेपाळच्या महापुरात लेकींसाठी आईची थरारक धडपड

Nepal Mother Save Daughter Video: नेपाळमध्ये मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या भीषण पूरस्थितीने मोठे संकट उभे केले आहे. अनेक भागांत घरं, वाहने आणि मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून बचाव आणि शोधमोहीम सुरू आहे. दिलेल्या माहितीनुसार, ६०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून २,००० पेक्षा जास्त लोक बेपत्ता असल्याचे सांगितले

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 31, 2026 | 02:55 PM
Nepal Mother Save Daughter Video: फक्त 2 सेकंदांचा फरक अन् मोठा अनर्थ! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Nepal Mother Save Daughter Video: फक्त 2 सेकंदांचा फरक अन् मोठा अनर्थ! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • नेपाळमध्ये महापुराचा मोठा तडाखा
  • ६०० हून अधिक मृत्यू, हजारो जण बेपत्ता असल्याचा दावा
  • भारताकडून अन्न-औषधांसह मदतीचा हात
Nepal Floods News: नेपाळमध्ये निसर्गाने अक्षरशः रौद्र रूप दाखवलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सगळीकडे पूर आला आहे. या पुरात लोकांची घरं, गाड्या, सगळं काही वाहून गेलंय. अजूनही तिथे लोकांना शोधण्याचं आणि वाचवण्याचं काम सुरू आहे. आतापर्यंत ६०० हून जास्त लोकांचा जीव गेल्याची बातमी आहे. तर २००० पेक्षा जास्त लोक कुठे आहेत हेच कळत समजत नसून त्यामधील 30 लोक हे पर्यटक असल्याची माहिती मिळते. भारताचे पण बरेच लोक बेपत्ता आहेत, त्यातली ३ लोकांची प्रेतं तर भारतात वाहून आल्याचं सांगितलं जातंय.

नेपाळची परिस्थिती हाताबाहेर

सोशल मीडियावर नेपाळचे असे व्हिडीओ येत आहेत की बघून अंगावर काटा येईल. सगळीकडे फक्त चिखल आणि पाणी. लोक चिखलातून एकमेकांना बाहेर काढत आहेत.या कठीण काळात भारताने लगेच मदतीचा हात पुढे केला आहे. भारतीय लष्कराची विमानं जेवण, औषधं आणि इतर मदत घेऊन नेपाळला पोहोचली आहेत. भारतासोबतच अजून काही देशांनी पण मदत पाठवली आहे.यातच दोन व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहेत. Nepal Mother Save Daughter Video:

Sirf 2 second ki deri hoti, maa apni dono betiyon ke saath paani mein sama jaati. pic.twitter.com/Fzy2a2RBy5 — Maratha Newz (@Maratha_NEWz) August 29, 2026

पहिल्या व्हिडिओमध्ये काय आहे?

पहिला व्हिडीओ एका आईच्या धाडसाचा आहे. व्हिडीओमध्ये दिसतंय की डोंगरावरून अचानक पाण्याचा मोठा लोंढा येतो. समोरच एक दोन मजली घर होतं, ते एका क्षणात पाण्यासोबत वाहून जातं. पाण्याचा वेग इतका जास्त होता की काही कळायच्या आत घर पडलं.त्याच ठिकाणी रस्त्यावर एक आई आणि तिच्या दोन लहान मुली उभ्या होत्या. मुली नुकत्याच शाळेतून आल्या होत्या, अंगावर शाळेचा ड्रेस आणि गळ्यात ओळखपत्र लटकत होतं. पाणी येताना पाहून आईने क्षणाचाही विचार केला नाही. तिने दोन्ही मुलींचा हात घट्ट पकडला आणि वर डोंगराच्या दिशेने पळायला लागली. पळताना ती रस्त्यावर पडली सुद्धा, पण लगेच उठली आणि मुलींना घेऊन धावत सुटली. जर तिने थोडा जरी उशीर केला असता तर खूप मोठी दुर्घटना घडली असती. तिच्या या वेळी दाखवलेल्या हुशारीचं सगळीकडे कौतुक होतंय.

Footage Shows How Family Trapped Inside Nepal’s Blue House Was Rescued 🎥 GANESH SHRESTHA pic.twitter.com/YX3NiDyoqW — Viral Stringer (@StringerViral) August 29, 2026

दुसऱ्या व्हिडिओमध्ये काय आहे?

दुसरा व्हिडीओ त्या प्रसिद्ध हिरव्या घराचा आहे. याआधी पण या घराचा व्हिडीओ आला होता. पुरात आजूबाजूची सगळी घरं वाहून गेली, पण हे हिरव्या रंगाचं दोन मजली घर मात्र जागचं हललं नाही. पहिल्या मजल्याचं थोडं नुकसान झालंय, पण घर अजूनही उभं आहे. चारही बाजूला पाणी असताना या घरातले लोक मदतीसाठी ओरडत होते.आता या घराचा नवा व्हिडीओ आला आहे. त्यात बचाव पथक त्या घरात अडकलेल्या लोकांना सुरक्षित बाहेर काढताना दिसत आहे. सुदैवाने या घरातले सगळे लोक सुखरूप आहेत.हे दोन्ही व्हिडीओ पाहून नेपाळमध्ये परिस्थिती किती भयानक आहे हे लक्षात येतं.

Web Title: Nepal mother save daughter video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2026 | 02:55 PM

Topics:  

  • Marathi News
  • viral video

संबंधित बातम्या

च्युइंग गम मिठाई नाही! गुजरात हायकोर्टाचा मोठा निर्णय, १२.५% व्हॅट आकारणीचा निर्णय कायम
1

च्युइंग गम मिठाई नाही! गुजरात हायकोर्टाचा मोठा निर्णय, १२.५% व्हॅट आकारणीचा निर्णय कायम

Chandrapur News: मोबाईल-इंटरनेटचा अभाव, तरी व्हिडिओ दाखवण्याची सक्ती; चंद्रपुरात मुख्याध्यापकांना नोटिसा बजावल्याने संघटना नाराज
2

Chandrapur News: मोबाईल-इंटरनेटचा अभाव, तरी व्हिडिओ दाखवण्याची सक्ती; चंद्रपुरात मुख्याध्यापकांना नोटिसा बजावल्याने संघटना नाराज

Bacchu Kadu: महायुतीतील बंडखोरीने शिक्षक मतदारसंघाची निवडणूक रंगली; बच्चू कडूंना अनिल बोंडेंबाबत विश्वास
3

Bacchu Kadu: महायुतीतील बंडखोरीने शिक्षक मतदारसंघाची निवडणूक रंगली; बच्चू कडूंना अनिल बोंडेंबाबत विश्वास

Nalasopara Fire : देव तारी त्याला कोण मारी ! ११व्या मजल्यावर अग्नितांडव, मृत्यूशी केली यशस्वी झुंज
4

Nalasopara Fire : देव तारी त्याला कोण मारी ! ११व्या मजल्यावर अग्नितांडव, मृत्यूशी केली यशस्वी झुंज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.