Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

USA Healthcare Cost: ‘अमेरिकेत राहणं परवडत नाही!’ हार्ट अटॅकनंतर विमा असूनही लाखोंचा खर्च, पुणेकराचा अनुभव व्हायरल

USA Healthcare Cost: अमेरिकेत गेल्यानंतर आयुष्य अधिक सुखकर होईल, अशी अनेकांची धारणा असते. मात्र अमेरिकेत नोकरी करणाऱ्या पुण्यातील युवानने सोशल मीडियावर आपला आरोग्यसेवेचा अनुभव शेअर केला आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, भारतात उपचारादरम्यान तपासण्या आणि डॉक्टरांची सेवा तुलनेने लवकर मिळाली.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 31, 2026 | 01:02 PM
USA Healthcare Cost: ‘अमेरिकेत राहणं परवडत नाही!’ (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

USA Healthcare Cost: ‘अमेरिकेत राहणं परवडत नाही!’ (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • अमेरिकेतील उपचारांचा अनुभव पुणेकराने केला शेअर
  • हॉस्पिटल बिल तब्बल $23,000 असल्याचा दावा
  • भारत आणि अमेरिकेतील आरोग्यसेवेच्या अनुभवांची तुलना
Pune Man in US Shares Healthcare Experience: आपल्याकडच्या बऱ्याच तरुणांना वाटतं अमेरिकेत गेलं की आयुष्य एकदम सेट झालं. तिकडे पैसा जास्त, गाड्या मोठ्या, रस्ते चांगले, सगळं काही भारी. म्हणूनच लाखो लोक अमेरिकेला जाण्यासाठी धडपड करत असतात. पण अमेरिकेत राहणाऱ्या पुण्याच्या एका मुलाने तिकडची दुसरी बाजू समोर आणली आहे. तो म्हणतोय, मला आता परत भारतात यायचंय. कारण अमेरिकेची हॉस्पिटल सिस्टिम खूपच त्रासदायक आहे. USA Healthcare Cost:

भारतात उपचार लवकर होतात…

हा व्हिडीओ yuvaanibanez नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आला आहे. त्यात दिसणाऱ्या मुलाचं नाव युवान आहे. तो सध्या अमेरिकेत जॉब करतोय. त्याने त्याचीच गोष्ट सांगितली आहे.काही वर्षांपूर्वी तो भारतात असताना अचानक बेशुद्ध पडला होता. घरच्यांनी लगेच त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं. तिथे कसलीही कागदपत्रं, फॉर्म भरायची कटकट नाही.

डॉक्टरांनी लगेच त्याला ऍडमिट करून घेतलं. चांगली प्रायव्हेट रूम दिली. लगेच ECG काढला, MRI, CT स्कॅन, रक्ताच्या टेस्ट सगळं काही करून टाकलं. लगेच रिपोर्ट आले आणि आजार काय आहे ते सांगितलं. या सगळ्यासाठी त्याला फक्त 500 डॉलर म्हणजे आपले 47 हजार रुपये लागले.पण हाच प्रसंग जेव्हा अमेरिकेत घडला तेव्हा चित्र पूर्ण वेगळं होतं.

अमेरिकेतील उपचाराचा खर्च हाता बाहेर…

अमेरिकेत रुग्णवाहिका बोलावली तर हजारो डॉलर लागतात म्हणून तो स्वतःच गाडी चालवत हॉस्पिटलला गेला. तिथे गेल्यावर लगेच डॉक्टर भेटेल असं वाटलं होतं, पण तसं झालंच नाही. आधी फॉर्म भरा, विम्याचे कागद दाखवा, या सगळ्यात त्याला दीड तास वेटिंग रूममध्येच बसावं लागलं. त्रास होत असताना सुद्धा कोणी लक्ष देत नव्हतं.नंतर डॉक्टरांनी सांगितलं की तुला छोटा हार्ट अटॅक येऊन गेला आहे.

त्यानंतर टेस्ट सुरू झाल्या. पण एकदा डॉक्टर भेटल्यावर परत डॉक्टरला भेटणं म्हणजे मोठं काम. तो म्हणाला मी डॉक्टरांना भेटायचा प्रयत्न केला, तर सांगितलं डॉक्टर खूप बिझी आहेत.आणि सगळ्यात मोठा धक्का म्हणजे बिल. त्या एका उपचारासाठी हॉस्पिटलने 23 हजार डॉलरचं बिल दिलं. म्हणजे आपले जवळपास 22 लाख रुपये लागले.

Beed Marethon Viral Video: लेकीच्या स्वप्नासाठी आईची अनवाणी झेप! पायात बूट नव्हते, पण मॅरेथॉन जिंकण्याचा जिद्दीचा विक्रम

तो परत भारतात येणार

त्याच्याकडे हेल्थ इन्शुरन्स होता तरीही त्यातले 7 हजार डॉलर म्हणजे 6 लाख 67 हजार रुपये त्याला स्वतःच्या खिशातून भरावे लागले.हाच अनुभव सांगताना तो म्हणतो, अमेरिकेत हवा चांगली आहे, रस्ते, बिल्डिंग सगळं भारी आहे. पण आजारी पडलात तर मात्र खूप हाल होतात. सगळं काम खूप सावकाश चालतं. भारतात डॉक्टर लगेच धावून येतात, तसं तिथे होत नाही.

त्यामुळे त्याने आता ठरवलंय की तो परत भारतात येणार आहे.त्याचा हा व्हिडीओ आता 50 हजारांहून जास्त लोकांनी पाहिला आहे. खाली बऱ्याच लोकांनी कमेंट केल्या आहेत. बऱ्याच जणांनी म्हटलंय की खरंच, पैसा सगळं काही नसतो, वेळेवर उपचार मिळणं जास्त महत्त्वाचं असतं.

Nepal Flood Viral House: महापुराचा कहर, पण ‘हे’ घर ठाम! आजूबाजूचं सगळं वाहून गेलं तरी घराला धक्का नाही; VIDEO व्हायरल

Web Title: Pune man in us shares healthcare experience 23000 hospital bill despite insurance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2026 | 01:02 PM

Topics:  

  • Marathi News
  • Pune
  • viral video

संबंधित बातम्या

Beed Marethon Viral Video:  लेकीच्या स्वप्नासाठी आईची अनवाणी झेप! पायात बूट नव्हते, पण मॅरेथॉन जिंकण्याचा जिद्दीचा विक्रम
1

Beed Marethon Viral Video: लेकीच्या स्वप्नासाठी आईची अनवाणी झेप! पायात बूट नव्हते, पण मॅरेथॉन जिंकण्याचा जिद्दीचा विक्रम

Nepal Flood Viral House: महापुराचा कहर, पण ‘हे’ घर ठाम! आजूबाजूचं सगळं वाहून गेलं तरी घराला धक्का नाही; VIDEO व्हायरल
2

Nepal Flood Viral House: महापुराचा कहर, पण ‘हे’ घर ठाम! आजूबाजूचं सगळं वाहून गेलं तरी घराला धक्का नाही; VIDEO व्हायरल

Aaple Sarkar Seva Kendra: पुणे जिल्ह्यात १,३७२ नवीन ‘आपले सरकार’ केंद्रांना मंजुरी; अर्ज करण्याची आज अंतिम मुदत!
3

Aaple Sarkar Seva Kendra: पुणे जिल्ह्यात १,३७२ नवीन ‘आपले सरकार’ केंद्रांना मंजुरी; अर्ज करण्याची आज अंतिम मुदत!

Ratnagiri CBSE School News: रोटरी स्कूल वैध की बेकायदेशीर? शिक्षणमंत्र्यांच्या विधानानंतर नवा वाद!
4

Ratnagiri CBSE School News: रोटरी स्कूल वैध की बेकायदेशीर? शिक्षणमंत्र्यांच्या विधानानंतर नवा वाद!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.