Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आधी श्वानाला बेदम मारहाण मग बाईकला बांधून …; अहमदाबामधील व्यक्तीचे संतापजनक कृत्य, Video Viral

सोशल मीडियावर एक संतापजनक व्हिडिओ पाहायला मिळत आहे. एका व्यक्तीने श्वानाला बाईकला बांधून फरपटत नेले आहे. याचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल होत असून प्राणी प्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Aug 25, 2025 | 12:59 PM
Man ties dog to bike and dragged him on streets video goes viral

Man ties dog to bike and dragged him on streets video goes viral

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका व्यक्तीने श्वानाला बाईकला बांधले आणि फरपटत नेले आहे. ही घटना अहमदाबामध्ये घडली असल्याचे सांगितले जात आहे. याचा घटनेचा सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून प्राणी प्रेमींनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. लोकांनी संबंधित व्यक्तीवर करावाईची मागणी केली आहे. सांगितले जात आहे की, या व्यक्तीने आधी श्वानाला बेदम मारहाण केली होती. नंतर त्याला बाईकला बांधले आणि गावभर फरपटत नेले. त्यानंतर व्यक्तीने त्याला पूलाखाली सोडून दिले.

सध्या त्याचा श्वानाला बाईकवरुन फरपटत नेत असल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामुळे प्राणी प्रेमींमध्ये विशेष करुन संतापाचे वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्या व्यक्तीवर भारतीय न्याय संहितेतील तरतुदीनुसार, प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायदा १९६० अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले असून त्याच्यावर न्यायालयीन कारवाई सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.

पण या घटनेमुळे अहमदाबादमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली असल्याचे समोर आले आहे. दिल्लीमध्येही भटक्या कुत्र्यांवरुन मोठा वाद सुरु होता. सध्या न्यायालयाने आक्रमक कुत्र्यांना शेल्टर होममध्ये पाठवण्याचा आणि इतर कुत्र्यांचे लसीकरण, नसबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. पण केवळ दिल्लीच नव्हे तर देशाच्या इतर काही भागांमध्येही भटक्या कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे.

रिअल लाईफ ‘Gunday’! फिल्मी स्टाईलमध्ये धावत्या मालगाडीतून पोरांनी लुटला कोळसा; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले…

अहमदाबाद में एक शख्स ने कुत्ते के साथ ऐसा सलूक किया की मानवता भी शर्मा जाए. pic.twitter.com/YPaQxtIFwH — Hemraj Singh Chauhan (@JournoHemraj) August 24, 2025

नेटकरी संतापले

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @JournoHemraj या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो लोकांनी पाहिले असून संताप व्यक्त केली आहे. अनेकांनी अलीकडे लोकांमध्ये माणूसकी नावाची गोष्ट उरलेली नाही असे म्हटले आहे, तर काहींनी भटक्या कुत्र्यांसोबत असेच झाले पाहिजे असे म्हटले आहे. पण व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतील कुत्रा नेमका पाळीव होता की, स्ट्रीट जॉग याची माहिती मिळालेली नाही. तसेच पुलावर नेऊन सोडल्यानंतर त्या कुत्र्याचे काय झाले याचीही माहिती मिळाली नाही.

बाईकवर रोमान्स प्रेमी जोडप्याला पडला महागात; पोलिसांनी रोमियो-ज्युलिएटवर ठोठवला भारी-भक्कम दंड, Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Man ties dog to bike and dragged him on streets video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2025 | 12:59 PM

Topics:  

  • Navarashtra Viral News
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

भारी मिस्टेक हो गया! लग्नमंडपात चिमुरड्यांची करामत; जयमालेच्या वेळी असं काही केलं की नवरदेवाची बोलतीच बंद, Video Viral
1

भारी मिस्टेक हो गया! लग्नमंडपात चिमुरड्यांची करामत; जयमालेच्या वेळी असं काही केलं की नवरदेवाची बोलतीच बंद, Video Viral

धावत पळत आला पण केअरटेकरने मिठी टाळताच चिमुकला हत्ती झाला नाराज, नजर फिरवत दाखवला रुसवा अन् पाहून युजर्सही झाले खुश; Video Viral
2

धावत पळत आला पण केअरटेकरने मिठी टाळताच चिमुकला हत्ती झाला नाराज, नजर फिरवत दाखवला रुसवा अन् पाहून युजर्सही झाले खुश; Video Viral

मस्ती मस्तीत संकट ओढावलं! तलावात उडी मारताच पाण्याच्या राक्षसाने घेतली जबरदस्त एंट्री, तो पळाला पण शेवटी जे घडलं… Video Viral
3

मस्ती मस्तीत संकट ओढावलं! तलावात उडी मारताच पाण्याच्या राक्षसाने घेतली जबरदस्त एंट्री, तो पळाला पण शेवटी जे घडलं… Video Viral

प्रेम हरलं नव्हतं, फक्त वेळ लागला! तरुणपणी प्रेमाला कबुली मिळाली नाही म्हणून 40 वर्षानंतर जोडप्याने बांधली लग्नगाठ; Video Viral
4

प्रेम हरलं नव्हतं, फक्त वेळ लागला! तरुणपणी प्रेमाला कबुली मिळाली नाही म्हणून 40 वर्षानंतर जोडप्याने बांधली लग्नगाठ; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.