Marathi song 'Tambadi-Chamdi' played in Germany Pride parade, Video Viral
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. कधी मजेशीर, कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. स्टंट, जुगाड, भांडण यांसारखे अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. अलीकडे सोशल मीडियावर मराठी गाणी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये गुलबी साडी, नऊवारी साडी, झापुकझुपूक, तांबडी-चामडी यांसरखी अनेक गाणी सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. या गाण्यावर जगभरातून व्हिडिओ बनवले जात आहे.
सध्या सोशल मीडियावर तांबडी-चामडी गाणे मोठ्या प्रमाणावर ट्रेंड होत आहे. अनेकजण यावर डान्स रिल्स बनवत आहेत. हे गाण जगभरातील लोकांच्या पसंतीस पडत आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत, सेलिब्रिटींपासून सामान्यांपर्यंत सगळेच या गाण्यावर व्हिडिओ बनवत आहेत. विषेश म्हणजे हे गाणे परदेशातही पोहोचले आहे. या गाण्यावर जर्मनीच्या एका पार्टीमध्ये हजारो लोकांनी ठेका धरला आहे. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. जर्मनीमधील पार्टीचा हा व्हिडिओ आहे.
DJ Kratex ने हा व्हिडिओ शेअर केला असून त्याचे गाणे परदेशातही सध्या छाप सोडत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका ट्रकमध्ये लोकांची पार्टी सुरु आहे. यावेळी लोक तांबडी-चामडी गाण्यावर नाचताना दिसत आहे. यापूर्वी देखील असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हे गाणे सोशल मीडियावर लोकांच्या पसंतीस पडत आहे. विशेष म्हणजे हा ट्रेंड परदेशात लोकप्रिय झाला आहे.
लाजिरवाणे! निसर्गाच्या कुशीत भारतीयांकडून कचरा; परदेशी पाहुण्याच्या वर्तनाने बसली चपराक, Video viral
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
हा व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होत असून याला लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. अनेकांनी या व्हिडिओवर मजेशीर प्रतिक्रीया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, “गाणं सोडा आधी ते डान्स शिकवा”, तर दुसऱ्या एकाने “मराठी गाणं वाजलेच पाहिजे” अशी प्रतिक्रीया दिली आहे. तिसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, “बाप रे काय डान्स केला, लका लका लका लका”, म्हटले आहे. अनेकांनी व्हिडिओ हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे.
जीवघेणा खेळ! चिमुकल्या समोर तरुणाचा धोकादायक स्टंट; नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त, VIDEO VIRAL
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.