जीवघेणा खेळ! चिमुकल्या समोर तरुणाचा धोकादायक स्टंट; नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त, VIDEO VIRAL (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
आजकाल लोक केसांवर विविध प्रकारच्या ट्रिटमेंट विविध प्रकारे स्टाईल करण्यासाठी वेगवेगळे एक्सपिरीमेंट करतात. यामध्ये अलीकडे फायर हेअर कटिंग हा प्रकार खूप ट्रेंड करत आहे. विशेष करुन तरुणांमध्ये याचे वेडं खूप वाढले आहे. केसांना आग लावून केस कट केले जातात. परंतु यामुळे अनेकांचा जीव धोक्यात आला आहे. शिवाय यासाठी हजारो पैसे देखील मोजावे लागतात.
असाच स्टंट तरुणाने केल आहे. परंतु तरुणाच्या या व्हिडिओवर लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. तरुणाने फायर हेअर कटिंगसाठी तरुणाने आपला जीव धोक्यात घातला असून काडीपेटीने केसाला आग लावून घेतली आहे. त्यानंतर त्यावर कांगवा फिरवतो आणि आग विझवतो. परंतु जर आगीने अचानक पेट घेतला असता तर तरुणाला गंभीर दुखापत झाली असतील. असा स्टंट करणं तरुणाला चांगलेच महागात पडले असते. धक्कादायक बाब म्हणजे तरुणाच्या बाजूला एक चिमुकला बसलेला आहे. यामुळे हे दृश्य पाहून लोकांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
असे म्हणतात लहान मुले जे पाहतात, जे ऐकतात तसेच बोलायला ऐकायला शिकतात. यामुळे लहानांसोमर अनेकदा पालक काही गोष्टींवर चर्चा करत नाहीत. आपल्या मुलांना चांगले संस्कार त्यांना द्यायचे असतात. परंतु अलकीडे सोशल मीडियाच्या नादात लोक धोकादायक स्टंट करत आणि आणि धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये लहान मुलांना देखील स्टंट करायला लावले जात आहेत, किंवा त्यांच्या समोर स्टंट केले जात आहे. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तरुणाने चिमुकल्यासमोर केसांना आग लागवल्याचा स्टंट केल्याने नेटकरी त्याच्यावर चांगलेच भडकले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Ghost Rider 😭 pic.twitter.com/uO2uIPwI8L
— reverie keona (@reveriekeona) July 25, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हारयरल होत असलेला व्हिडिओसोशल मीडिया प्लॅटपऑर्म एक्सवर @reveriekeona या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. अनेकांनी तरुणाच्या निष्काळजीपणावर संताप व्यक्त केला आहे. तरुण हा स्टंट करताना चिमुकल्यासमोर करत आहे, यामुळे लोक संताप व्यक्त करत आहे. लहान मुले जे पहातात, तेच करतात यामुळे असा स्टंट त्यांच्यासमोर करणे धोकादायक असल्याचे लोकांनी म्हटले आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.