Election Results Memes : निवडणुकांवर मीम्सचा पाऊस; बंगाल आणि तामिळनाडू सर्वाधिक चर्चेत (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सध्या देशात पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. ०४ मे पासून निवडणुकांचा निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. सकाळपासून आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू आणि पद्दुचेरी येथील निवडणुकांचे निकाल समोर येते आहे. तसेच बारामती जिल्ह्यातही निवडणुकांच्या निकाल जाहीर करणे सुरु आहे. या दरम्यान सोशल मीडियावर निवडणुकांच्या निकालावरुन मीम्स आणि मिश्किल प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. निकालाला सुरुवात झाल्यावर अनेक राज्यांमध्ये चुरशीची लढत दिसून आली. यामुळे सोशल मीडिया वापरकर्त्यांनी मीम्स शेअर करायला सुरुवात केली आहे.
प्रॅंक पडला महागात! AI फोटो शेअर केल्याने संपूर्ण शहरात लॉकडाऊन; आता तरुणाला खावी लागणार जेलची हवा?
एका मीममध्ये बंगालमधील परिस्थितीचे चित्रण करण्यात आली आहे. यामध्ये भाजप आघाडीवर आहे. त्यानंतर टीएमसी आणि कॉंग्रेसची परिस्थिती दाखवण्यात आली आहे.
Election results 😹😁#electionresult2026 pic.twitter.com/QpfSEZqSTJ — Byomkesh (@byomkesbakshy) May 4, 2026
आणखी एका नेटकऱ्याने बंगाल, आसाम आणि तामिळनाडू राज्यांवर एक मजेशीर मीम तयार केले आहे. यामध्ये बंगाल आणि आसाममधील भाजपची स्थिती दाखवण्यात आली आहे.
Chunavi Rujhan #electionresult2026 pic.twitter.com/l2D8sgnzTI — oliver (@jaynildave) May 4, 2026
याशिवाय बंगला निवडणूक निकालांवर किती बारकाईने लक्ष ठेवले जात आहे, हे दृश्य दाखवणारे एक मीम शेअर करण्यात आले आहे. ज्यामध्ये भाजप आणि टीएमसीचा पोल कसा खालीवर होत आहे, हे अत्यंत मजेशीर पद्धतीने दाखवले आहे.
BJP and TMC whole day today.#electionresult2026 pic.twitter.com/8FwxKgcsTG — 4pennyonhorse (@4pennyonhorse) May 4, 2026
एका मीममध्ये रहमान डकैतची एन्ट्री दाखवण्यात आली आहे. यावरुन पश्चिम बंगलामध्ये भाजपची एन्ट्रीवर भाष्य करणारे हे मीम आहे.
Today specially in #Westbengal
🪷🪷🪷🤞🤞🤞🥳🥳🥳🪷🪷🪷#electionresult2026#WestBengalLegislativeAssemblyelection2026 pic.twitter.com/JEO6BsBpMb — 𝐀𝐁𝐇𝐀 ❤🇮🇳 (@Abs261) May 4, 2026
आणखी एका मीममध्ये धमाल चित्रपटातील दृश्य बंगलामधील भाजपच्या विजयावर भाष्य करणारे दाखवण्यात आला आहे. सध्या यांसारखे अनेक मीम्स सोशल मीडियावर तुफान वेगाने व्हायरल होत आहेत.
Me and my friends waiting for election results like : #electionresult2026 pic.twitter.com/9NC7hIKKmV — UmdarTamker (@UmdarTamker) May 4, 2026
रिलचा नाद बेतला जीवावर! उंच टाकीवर चढले अन् शिडीच तुटली; पाहा रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक VIDEO
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






