रिलचा नाद बेतला जीवावर! उंच टाकीवर चढले अन् शिडीच तुटली; पाहा रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक VIDEO (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (०२ मे) उत्तर प्रदेशच्या सिद्धार्थनगर येथे कांशीराम निवासी वसाहतीत ही घटना घडली आहे. पाच मुले रिल बवनण्यासाठी एका उंच टाकीवर चढले होते. याच वेळी अचानक टाकीची शिडी तुटली आणि तरुण वरती अडकले. यातील तीन मुले चढत असताना शिडी तुटल्याने जोरात खाली आदळले. यामुळे दोन जण गंभीर जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे.
तर शिडी तुटल्यामुळे टाकीवर अडकेल्या मुलांना खाली उतरण्यास कोणताही रस्ता उरला नव्हता. यामुळे त्यांना वाचवण्यासाठी रात्री गोरखपूरहून एनडीआरएफच्या पथकाला बोलवावे लागले आहे. एनडीफने या मुलांना हेलिकॉप्टरने सुरक्षित उतरवले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जवळपास १६ तास ही मुलं टाकीवर अडकून पडली होती. रात्रीच्या अंधारात बचाव कार्यात अडथळा येत असल्याचे रविवारी (०३ मे) सकाळी ५.३० च्या सुमारास त्यांना रेक्स्यू करण्यात आले.
On a request from state government authorities, an IAF Mi 17 V5 of Central Air Command (CAC) was deployed to rescue two stranded children, who were stuck on top of a water tank in Sidharth Nagar in Gorakhpur, Uttar Pradesh. The children were stranded in the night as the ladder of… pic.twitter.com/dZ2D4shbQS — CAC, IAF (@CAC_CPRO) May 3, 2026
व्हायरल होत असलेल्या घटनेची माहिती भारतीय नौदलाने एक्सवर @CAC_CPRO या अकाऊंटवर शेअर केली आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. अनेकांनी यावर संताप व्यक्त केला आहे. यावरुन पुन्हा एकदा रिलचा नाद किती महागात पडू शकतो हे सिद्ध झाले आहे. पण लोक काही सुधारण्याचे नाव घेईनात.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






