Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोबाइल ॲपवरून कळणार कर्करोगाचा धोका; टाटा रुग्णालय विकसित करतंय खास मोबाइल ॲप

कर्करोगाच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांनी एक नवे डिजिटल साधन विकसित करण्याची तयारी सुरू केली आहे. याच्या मदतीने लोकांना स्वतःच्या आरोग्याविषयी प्राथमिक माहिती मिळू शकणार आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 06, 2026 | 12:07 PM
मोबाइल ॲपवरून कळणार कर्करोगाचा धोका; टाटा रुग्णालय विकसित करतंय खास मोबाइल ॲप

मोबाइल ॲपवरून कळणार कर्करोगाचा धोका; टाटा रुग्णालय विकसित करतंय खास मोबाइल ॲप

Follow Us
Close
Follow Us:
  • नव्या डिजिटल साधनाच्या मदतीने व्यक्तीला कर्करोगाचा संभाव्य धोका समजण्यास मदत होणार आहे.
  • काही वैयक्तिक आणि जीवनशैलीशी संबंधित माहितीच्या आधारे जोखीम अंदाजे ठरवली जाणार आहे.
  • यामुळे जास्त जोखमीच्या गटातील लोकांची वेळेत तपासणी करणे अधिक सोपे होणार आहे.
कर्करोगाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे संपूर्ण लोकसंख्येची तपासणी करणे भारतासारख्या देशात व्यवहार्य नाही. अशा परिस्थितीत कोणत्या व्यक्तींना कर्करोगाचा धोका अधिक आहे हे आधीच ओळखता आले, तर वेळेत तपासणी व उपचार शक्य होऊ शकतात, याच उद्देशाने टाटा रुग्णालयाकडून एक नवे मोबाइल ॲप विकसित केले जात असून त्याच्या माध्यमातून व्यक्तीला ब्रेस्ट कर्करोगाचा धोका सरासरीपेक्षा किती अधिक किंवा कमी आहे याचे प्राथमिक आकलन मिळणार आहे.

पायांमध्ये सतत जळजळ होतेय? दुर्लक्ष करू नका, असू शकतो गंभीर आजाराचा इशारा!

यामुळे जास्त जोखमीच्या गटातील महिलांची लवकर सक्रीनिंग करून कर्करोगावर नियंत्रण मिळवण्यास मदत होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. टाटा रुग्णालयातील ‘सेंटर फॉर कॅन्सर एपिडेमियोलॉजी’ चे संचालक डॉ. राजेश दीक्षित यांनी सांगितले की, भारतात मर्यादित संसाधनांमुळे सर्वांची कर्करोग तपासणी करणे शक्य नाही. त्यामुळे ज्या व्यक्तींना धोका अधिक आहे, अशांची आधी ओळख करणे आवश्यक ठरते.

धोका कसा ठरवणार

प्रस्तावित ॲपमध्ये सांख्यिकी मॉडेलचा वापर करण्यात येणार असून वय, बॉडी मास इंडेक्सर, मुलाची संख्या, रजोनिवृतीची स्थिती, कंबर-नितंब गुणोत्तर तसेच जीवनशैलीशी संबंधित काही घटकाची माहिती भरल्यानतर संबंधित व्यक्तीच्या कर्करोगाच्या धोक्याचा अंदाज दिला जाणार आहे. सुरुवातीला ‘रिलेटिव्ह रिस्क’ निश्चित करून त्याचे भारतीय लोकसंख्येतील कर्करोगाच्या प्रमाणाशी तुलना करून ‘ॲब्सोल्यूट रिस्क’ ठरवला जाईल.

हे ॲप पूर्णपणे मोफत असणार असून वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती कोणत्याही सव्र्व्हरवर साठवली जाणार नाही, ती केवळ संबंधित मोबाईलमध्येच राहील, असेही स्पष्ट करण्यात आले. सध्या या ॲपच्या माध्यमातून ग्रेस्ट कर्करोगासोबतच बक्कल म्यूकोसा (तोडाचा कर्करोग) आणि गॉलब्लेंडर कर्करोगाच्या जोखमीचे आकलन करण्यासाठी काम सुरू आहे. हे ॲप यंदाच्या नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

प्रत्येक मधुमेह रुग्णाने खावीत ही 2 फळे, याचे सेवन कोणत्या औषधाहून कमी नाही… डॉक्टरांनी दिला सल्ला

सेंटर फॉर कैन्सर एपिडेमियोलॉजीचे संचालक डॉ. राजेश दीक्षित म्हणाले की, “भारतासारख्या मोठ्या लोकसंख्या असलेल्या देशात प्रत्येक व्यक्तीची कर्करोग तपासणी करणे शक्य नाही, त्यामुळे ज्या व्यक्तीना कर्करोगाचा धोका जास्त आहे त्यांची आधी ओळख करून त्यांची स्क्रीनिंग करणे हा अधिक प्रभावी मार्ग आहे. प्रस्तावित मोबाइल ॲपमुळे व्यक्तीला स्वतःच्या जोखमीबद्दल प्राथमिक माहिती मिळेल आणि गरज असल्यास वेळेत तपासणी करून कर्करोग लक्कर टप्यात शोधता येईल”.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Mobile app to detect cancer risk special app being developed by tata hospital

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 12:07 PM

Topics:  

  • Cancer Awareness
  • lifestyle news
  • Tata

संबंधित बातम्या

प्रत्येक मधुमेह रुग्णाने खावीत ही 2 फळे, याचे सेवन कोणत्या औषधाहून कमी नाही… डॉक्टरांनी दिला सल्ला
1

प्रत्येक मधुमेह रुग्णाने खावीत ही 2 फळे, याचे सेवन कोणत्या औषधाहून कमी नाही… डॉक्टरांनी दिला सल्ला

पायांमध्ये सतत जळजळ होतेय? दुर्लक्ष करू नका, असू शकतो गंभीर आजाराचा इशारा!
2

पायांमध्ये सतत जळजळ होतेय? दुर्लक्ष करू नका, असू शकतो गंभीर आजाराचा इशारा!

Marathi Bhasha : मराठीची बाराखडी ; ‘भेटणं’ आणि ‘मिळणं’ यातील फरक काय ?
3

Marathi Bhasha : मराठीची बाराखडी ; ‘भेटणं’ आणि ‘मिळणं’ यातील फरक काय ?

सकाळी पोट साफ होत नाही? दिवसभर जडपणा वाटतो? मग दह्यात हा एक पदार्थ मिसळून खा, आतड्यांमधील सर्व घाण होईल साफ
4

सकाळी पोट साफ होत नाही? दिवसभर जडपणा वाटतो? मग दह्यात हा एक पदार्थ मिसळून खा, आतड्यांमधील सर्व घाण होईल साफ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.