Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोबाईलने केला घात! लक्ष भरकटलं अन् थेट छतावरून खाली कोसळला तरुण; अंगाचा थरकाप उडवणारा Video Viral

Accident Viral Video : मोबाईलमध्ये इतका मग्न झाला की, फ्लोअरवरील मोकळ्या जागेवर लक्षच गेले नाही. परिणामी व्यक्ती मोठ्या अपघाताला बळी पडला. या घटनेचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत असून यूजर्सने इंटिरियर डिझायनरला अटक करण्याची मागणी केली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 11, 2026 | 01:58 PM
मोबाईलने केला घात! लक्ष भरकटलं अन् थेट छतावरून खाली कोसळला तरुण; अंगाचा थरकाप उडवणारा Video Viral

मोबाईलने केला घात! लक्ष भरकटलं अन् थेट छतावरून खाली कोसळला तरुण; अंगाचा थरकाप उडवणारा Video Viral

Follow Us
Follow Us:
  • मोबाईलमध्ये लक्ष गुंतल्याने तरुणासोबत घडली धक्कादायक घटना.
  • काही क्षणांतच तरुणाचा तोल गेला आणि आजूबाजूचे लोक मदतीसाठी धावले.
  • या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच नेटकऱ्यांमध्ये चर्चेला उधाण आलं.
आताच्या काळात मोबाईल हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. पूर्वी कामासाठी वापरला जाणारा फोन आता आणखी स्मार्ट झाला आहे ज्यामुळे याचा वापर आता मर्यादित राहिलेला नाही. आता फक्त फोनकाॅल्स किंवा मेसेजेससाठीच फोनचा वापर केला जात नाही तर आपल्या मनोरंजनासाठी यात अनेक स्मार्ट फिचर्स आणि सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. हेच कारण आहे की, लोक आपला अधिकतर वेळ हा मोबाईलवर घालवतात. तथापि, मोबाईलचा अधिक वापर आपल्या जीवासाठी घातक देखील ठरु शकतो. लोकांमध्ये याचा वापर आता इतका वाढला आहे की, रस्त्याने चालतानाही लोकांचे अधिकतर लक्ष हे त्यांच्या स्मार्टफोनवर असते ज्यामुळे अपघाताची स्थिती निर्माण होते. सध्याच्या व्हायरल व्हिडिओमध्येही अशीच एक घटना घडून आली आहे. याचा एक व्हिडिओ देखील सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे जो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. चला यात नक्की काय घडून आलं ते सविस्तर जाणून घेऊया.

अजब-गजब! व्यक्तीने नाकात घातल्या ८ बिड्या अन् नाकातून काढला धूर, दृष्य पाहून यूजर्स चक्रावले; Video Viral

मोबाईलमुळे झाला अपघात…

मोबाईलचा अतिवापर आपल्या जीवास कसा घातक ठरु शकतो याचे जिवंत उदाहरण तुम्हाला सध्याच्या व्हायरल व्हिडिओतून पाहायला मिळेल. व्हायरल व्हिडिओत छतावर एक व्यक्ती चालताना दिसतो. त्याचे संपूर्ण लक्ष हे त्याच्या फोनवर असते, ज्यामुळे चालताना तो समोर पाहत नाही आणि याचाच पश्चाताप त्याला पुढे जाऊन होतो. व्यक्ती मोबाईलमध्ये पाहत पुढे चालत जातो खरा पण पुढे एक मोठी मोकळी जागा आहे हे त्याच्या नजरेत येत नाही. परिणामी मोकळ्या जागेत व्यक्तीचा पाय पडतो आणि तो धाडकन खाली कोसळतो. व्यक्तीला काही समजेल आणि तो स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करेल याआधीच तो अपघाताला बळी पडलेला असतो. व्यक्ती इतका जोरात खाली पडतो की आजूबाजूची सर्व लोक ते दृष्य पाहून हादरतात. व्हिडिओच्या शेवटी लोक शिड्यांवरून खाली उतरत व्यक्तीच्या मदतीसाठी धाव घेताना दिसून येतात. वरच्या मजल्यावरुन खाली कोसळल्याने व्यक्तीला दुखापत तर चांगलीच झाली असेल तथापि त्याच्या प्रकृतीची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

A guy fell from the floor above. Please watch where you’re walking and look down too💀😭 pic.twitter.com/k9XZg3s5eC — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) September 10, 2026

कोलकाता मेट्रोमध्ये महिलांचा हायव्होल्टेज ड्रामा! थेट ऑन-ड्यूटी RPF कर्मचाऱ्याशीच भिडल्या; VIDEO तुफान व्हायरल

या घटनेचा व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत ७ लाखाहून अधिकचे व्हूज मिळाले असून अनेक यूजर्सने व्हिडिओतील दृष्यांवर कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “फ्लोअरची डिजाईन किती बकवास आहे, याच्या मधोमध रिकामी बाजू ठेवण्याची काहीच गरज नव्हती”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “पण तिथे ती मोकळी जागा कशासाठी आहे?”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “फ्लोअरच्या विचित्र डिजाईनमुळे हे घडले, इंटिरियर डिझायनरला किंवा आर्किटेक्टला लगेच अटक करा”.

टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.

Web Title: Mobile phone distraction young man falls from roof shocking incident video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2026 | 01:58 PM

Topics:  

  • Accident
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

अजब-गजब! व्यक्तीने नाकात घातल्या ८ बिड्या अन् नाकातून काढला धूर, दृष्य पाहून यूजर्स चक्रावले; Video Viral
1

अजब-गजब! व्यक्तीने नाकात घातल्या ८ बिड्या अन् नाकातून काढला धूर, दृष्य पाहून यूजर्स चक्रावले; Video Viral

कोलकाता मेट्रोमध्ये महिलांचा हायव्होल्टेज ड्रामा! थेट ऑन-ड्यूटी RPF कर्मचाऱ्याशीच भिडल्या; VIDEO तुफान व्हायरल
2

कोलकाता मेट्रोमध्ये महिलांचा हायव्होल्टेज ड्रामा! थेट ऑन-ड्यूटी RPF कर्मचाऱ्याशीच भिडल्या; VIDEO तुफान व्हायरल

वय फक्त एक नंबर! आजीबाईंनी पोल वॉल्टमध्ये दाखवला असा पराक्रम की सगळेच झाले थक्क, VIDEO पाहून लोकांनी तोंडात घातली बोटं
3

वय फक्त एक नंबर! आजीबाईंनी पोल वॉल्टमध्ये दाखवला असा पराक्रम की सगळेच झाले थक्क, VIDEO पाहून लोकांनी तोंडात घातली बोटं

आता भाज्यांऐवजी फ्रिजमध्ये ठेवले जाणार माणूस? जपानचा ‘हा’ VIDEO पाहून फिरून जाईल डोके!
4

आता भाज्यांऐवजी फ्रिजमध्ये ठेवले जाणार माणूस? जपानचा ‘हा’ VIDEO पाहून फिरून जाईल डोके!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.