
mother satnding beside disabled child encouraging him to walk proudly on stage as Shivaji Maharaj Video goes viral
असे म्हणतात आईसाठी प्रत्येक मूल हे सारखेच असते. मुलामध्ये कितीही अवगुण असले, किंवा त्यामध्ये काही दोष असला तर त्याला दूर करत नाही. आई सर्व मुलांवर समान प्रेम करते. कुठल्याही परिस्थितीत, अडचणीत आपल्या बाळांना एकटं सोडत नाही. आज याचा प्रत्यय आणणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एक चिमुरडा शिवरायांच्या वेशात रॅम्पवॉक करत आहे. हा मुलगा दिव्यांग आहे, परंतु त्याला त्याच्या आईची साथ लाभल्याने सर्वात भाग्यशाली आहे. हा चिमुकला शिवाजी महाराजांच्या वेशा रंगमचांवर चालत येत असून त्याच्या आईने त्याला आधार दिला आहे. त्याला प्रोत्यासहन दिले आहे. त्याच्या भीतीला दूर केले आहे. तिचा हा मजहूत आधार मुलासाठी खूप खास आहे. प्रत्येक पावलावर चिमुरड्याची आई त्याच्यासोबत आहे.
अंग गोठवणाऱ्या थंडीत साधूंची ध्यानसाधना? बर्फातील साधूंच्या व्हायरल व्हिडिओने उडाली खळबळ
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @oc_.alpha.sp या अकाऊंटवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. हा व्हि़डिओ अनेकांच्या पसंतीस पडत आहे. अनेकांची चिमुरड्याचे भरभरुन कौतुक केले आहे. तसेच्या त्याच्या आईचेही कौैतुक केले आहे. आई ही आईच असते असे लोकांनी म्हटले आहे. एका युजरने यासाठी खूप हिंमत्त लागते, शिवाजी महाराजांना नक्कीच चिमुकल्याचा अभिमान वाटला असता असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका युजरने त्या आईच्या गोड हास्याने माझ्या डोळ्यात पाणी आले असे म्हटले आहे. अनेकांनी या व्हिडिओवर हार्ट इमोजी देखील शेअर केले आहेत.
हीच खरी श्रीमंती! कामावरुन परतेल्या वडीलांचे मुलीनं केलं गोड स्वागत, क्षणात थकवा गायब; VIDEO VIRAL
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.