अंग गोठवणाऱ्या थंडीत साधूंची ध्यानसाधना? बर्फातील साधूंच्या व्हायरल व्हिडिओने उडाली खळबळ (फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट)
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, बर्फाने पूर्ण जमिनी झाकलेली दिसत आहे. थंडी इतकी भयानक आहे की, कोणीही सामान्य माणूस इथे काही मिनिटं देखील टेकू शकणार नाही. पण धक्कादायक बाब म्हणजे या ठिकाणी एक साधू ध्यान करताना दिसत आहे. त्याचे मानेपर्यंतचे सर्व अंग बर्फात झाकले गेले असून केवळ चेहरा दिसत आहे. डोळे बंद शांतपणे साधू साधना करत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत. तुम्ही पाहू शकता की साधूची लांब पांढरी दाढी, जटा, कपाळावर लाल टीका दिसत आहे. साधू अगदी शांतपणे डोळे बंद करुन बसला आहे. थंडीचा त्रास किंवा कोणत्याही प्रकारची अस्वस्थता त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही.
व्हायरल व्हिडिओ
है किसी और मैं इतनी हिम्मत ✋💀 ये सिर्फ सनातन धर्म में ही संभव है
जयकारा वीर बजरंगी हर हर महादेव 🚩📿 🕉️ pic.twitter.com/hfIiTqyF60 — नम्रता सिंह🇮🇳 (@FanOfJhasiRani2) December 18, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @FanOfJhasiRani2 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. याव्हिडिओला काहींनी अध्यात्म आणि ज्ञानसाधनेच्या शक्तीशी जोडले आहे. तर काहींनी हा व्हिडिओ AI जनरेटेड असल्याचे म्हटले आहे. सध्या दोन गटांमध्ये यावरुन तीव्र वाद सुरु आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून चर्चेचा विषय बनले आहेत. सध्या सोशल मीडियावर या व्हिडिओबाबत वेगवेगळे दावे केले जात आहेत. अनेकजण हा व्हिडिओ पाहून आश्चर्यचकित झाले आहेत. एवढया थंडीत माणूस स्थिर किंवा जिवंत कसा राहू शकतो असा प्रश्न लोक विचारत आहे. शिवाय कपडे आणि हीटरशिवाय तर राहणे कठीणच आहे. कोणत्याही संरक्षणाशिवाय बर्फात ध्यान करताना साधू दिसत आहे. पण अनेकांनी हा व्हिडिओ AI जनरेटेड असल्याचेच म्हटले आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






