Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नाशिकमध्ये आई-वडिलांनी टाकून दिली चिमुकली; चेहऱ्यावरील निरागस स्मितहास्याने सोशल मीडिया यूजर्स झाले भावूक; Video Viral

Baby Girl Video : लाल कापडात गुंडाळून मुलीला घराबाहेर सोडलं... नवजात मुलीचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत असून यातील दृष्यांनी यूजर्सना भावूक केलं आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 04, 2026 | 09:43 AM
नाशिकमध्ये आई-वडिलांनी टाकून दिली चिमुकली; चेहऱ्यावरील निरागस स्मितहास्याने सोशल मीडिया यूजर्स झाले भावूक; Video Viral

नाशिकमध्ये आई-वडिलांनी टाकून दिली चिमुकली; चेहऱ्यावरील निरागस स्मितहास्याने सोशल मीडिया यूजर्स झाले भावूक; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • नाशिकमध्ये नवजात चिमुकली एका घराबाहेर बेवारस अवस्थेत आढळल्याचा दावा; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.
  • लाल कापडात गुंडाळलेली चिमुकली आजूबाजूच्या लोकांकडे पाहून निरागसपणे हसताना दिसते; दृश्याने अनेकांचे मन हेलावले.
  • व्हिडिओवरील दावा अद्याप अधिकृतरीत्या पुष्टी झालेला नसून, अनेकांनी कमेंट्समधून दुःख व्यक्त करत चिमुकलीला दत्तक घेण्याचीही इच्छा व्यक्त केली.
सोशल मिडियावर दररोज अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. इथे कधी काय दिसून येईल याचा काही नेम नाही. सोशल मिडियावर कधी थक्क करणारे तर कधी भावूक करणारे दृष्य शेअर होतात. आताही एक हृदयद्रावक व्हिडिओ इथे शेअर करण्यात आले आहे ज्यातील दृष्ये पाहून अनेकजण भावूक झाले. माहितीनुसार हा व्हिडिओ नाशिकमधून समोर येत असून यात एका नवजात मुलीला आई-वडिलांनी दुसऱ्याच्या घरासमोर फेकून दिल्याची माहिती आहे. व्हिडिओत मुलगी घरासमोरील फर्शीवर पडलेली दिसते.

आपल्यासोबत काय घडलं आहे याची जाणीव नसताना मुलगी आजूबाजूंच्या लोकांना बघत निरागसपणे हसू लागते. हा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर चांगलाच ट्रेंड करत असून व्हिडिओतील मुलीला पाहून अनेकांनी तिच्या परिस्थितीवर आपल्या भावूक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. जन्मत:च तिला सोडून देण्यात आलं हे किती मोठं दुर्दैव आहे अशा प्रतिक्रिया व्हिडिओला मिळत आहेत. चला घटनेविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Unique Wedding: अजब लग्नाची गजब गोष्ट, दोन जोडप्यांनी वेधलं देशाचे लक्ष, जाणून घ्या संपूर्ण गोष्टचं

काय घडलं व्हिडिओत?

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमध्ये माणूसकीला काळीमा फासणारा हा प्रकार घडून आला आहे. व्हिडिओमध्ये लाल रंगाच्या कापडात नवजात मुल एका घराच्या दरवाजाबाहेर फर्शीवर पडलेली दिसते. मुलगी झापेत नसते तर पूर्ण शुद्धीत ती आजूबाजूचे दृष्य पाहत असते. मुलीच्या आजूबाजूला काही लोक जमलेली दिसतात. यातीलच एक व्यक्ती घटनेचा व्हिडिओ मोबाईलच्या कॅमेरात कैद करुन सोशल मिडियावर शेअर करतो.

इंटरनेटवर दावा केला जात आहे की, मुलगी म्हणून जन्माला आल्यामुळे तिच्या आईवडिलांनी तिला सोडून दिले. व्हिडिओमध्ये जमिनीवर पडलेल्या चिमुकल्या मुलीला पाहून अनेकांना तिच्या परिस्थितीसाठी वाईट वाटले. या काही सेकंदाच्या क्लिपमध्ये मुलगी आजूबाजूच्या लोकांना पाहून निखळपणे हसतानाही दिसते. तिचे हे निरागस हसू अनेकांच्या मनाला भिडते आणि लोक व्हिडिओवर भावूक प्रतिक्रिया व्यक्त करु लागतात. तथापि, या व्हिडिओतील दाव्याची पुष्टी अद्याप करण्यात आलेली नाही.

Viral Video: काजू कतली खरेदी करणं पडलं महाग! पुढे जे समोर आलं, ते पाहून ग्राहक हादरला

हा व्हिडिओ @flix.indian नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला ३ लाखाहून अधिकचे व्ह्यूज मिळाले असून अनेक यूजर्सने व्हिडिओतील दृष्यांवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “खूपच दुःखद. लोक असं कसं करू शकतात?”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मला खरोखरच या चिमुकलीला दत्तक घ्यायचे आहे. कृपया कोणीतरी मला यासंदर्भातील जबाबदार व्यक्तीचा संपर्क क्रमांक देऊ शकेल का? मला या बाळाला दत्तक घ्यायचे आहे”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “कोणती आई असं करू शकते? हे पाहून हृदय हेलावून जातं. आपल्या हृदयाचा एक तुकडा कुठेतरी दूर आहे, याची त्यांना जाणीव होत नसेल का?”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Nashik abandoned newborn baby girl viral video heartbreaking smile social media reactions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 09:43 AM

Topics:  

  • Nashik
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

अद्भूत! बॉलीवूड गाण्यावर थिरकला ह्युमनॉईड रोबोट; भारतीय शास्त्रीय नृत्याचा VIDEO तुफान व्हायरल
1

अद्भूत! बॉलीवूड गाण्यावर थिरकला ह्युमनॉईड रोबोट; भारतीय शास्त्रीय नृत्याचा VIDEO तुफान व्हायरल

बैलाने मारली जोरदार धडक! स्कूटीवरून रस्त्यावर कोसळली तरुणी; थेट कारवर आदळले डोके,अपघाताचा Video Viral
2

बैलाने मारली जोरदार धडक! स्कूटीवरून रस्त्यावर कोसळली तरुणी; थेट कारवर आदळले डोके,अपघाताचा Video Viral

धक्कादायक! मुलीने केला प्रेमविवाह; संतापलेल्या कुटुंबाने जिवंतपणीच मुलीचा घातला ‘तेरावा’, VIDEO समोर
3

धक्कादायक! मुलीने केला प्रेमविवाह; संतापलेल्या कुटुंबाने जिवंतपणीच मुलीचा घातला ‘तेरावा’, VIDEO समोर

तरुणाच्या जुगाडाला तोड नाही! एक-दोन नाही तर तब्बल ६ चाकांची बाईक बनवली, पाहून यूजर्स डोळे विस्फारले; Video Viral
4

तरुणाच्या जुगाडाला तोड नाही! एक-दोन नाही तर तब्बल ६ चाकांची बाईक बनवली, पाहून यूजर्स डोळे विस्फारले; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.