(फोटो सौजन्य: X)
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये नेपाळची नदी धोक्याची पातळी ओलांडताना दिसत आहे. पाण्याचा प्रवाह इतका वेगवान असतो की, तो जवळपास त्याच्या वर असणाऱ्या ब्रिजला स्पर्श करणार असतो. अशा परिस्थितीत खरंतर ब्रिजवर चालणे म्हणजे धोकादायक परिस्थितीला जवळ ओढण्यासारखे आहे. एका व्यक्तीने मात्र धाडस करुन ते आव्हान स्वीकारले आणि कुटुंबाच्या मदतीसाठी तो या ब्रिजवरुन धावत पळू लागला. खरंतर ब्रिजच्या दुसऱ्या बाजूला त्याचे कुटुंबिय असतात ज्यांची मदत त्याला करायची असते. पाण्याचा प्रवाह पाहता तिथे उपस्थित कुणीही ब्रिजवर जाण्याचे धाडस करत नाही पण व्यक्ती मात्र आपल्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी ब्रिजवर धावत सुटतो. यावेळी त्याच्या मनात स्वत:साठीचा स्वार्थ नसतो, असते ती फक्त कुटुंबासाठीची काळजी…
व्यक्ती ब्रिजवरुन न डगमगत धावत असताना तिथे उपस्थित एक व्यक्ती या क्षणांचा व्हिडिओ आपल्या फोनच्या कॅमेरात कैद करतो. अनेकांनी या व्हिडिओच्या सत्यतेवर प्रश्न उपस्थित करत हे एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार केलेले दृष्य असल्याचा दावा केला. पण जेव्हा व्हिडिओची पडताळणी करण्यात आली तेव्हा हा व्हिडिओ खरा असल्याचे समोर आला. यात कोणत्याही तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला नसून व्हिडिओतील घटना ही सत्यात घडलेला प्रसंग आहे.
This video has now come from the floods in Nepal. The river was rising rapidly, with the water almost touching the cable bridge. This man’s family was stranded on the other side, while he was on the opposite side. The bridge could have broken at any moment. But this man had to… pic.twitter.com/Un6X5iu3ri — Saffron Chargers (@SaffronChargers) August 31, 2026
घटनेचा हा व्हिडिओ @SaffronChargers नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत ३ मिलियनहून अधिकचे व्हूज मिळाले असून अनेक यूजर्सने यातील दृष्यांवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “हो, नेपाळमधील पुराच्या वेळचा खरा व्हिडिओ आहे. लोक पुरात अडकले होते आणि इंटरनेट सेवा बंद होती, त्यामुळे त्या वेळी सर्व फुटेज बाहेर येऊ शकले नाही. या घटनेशी संबंधित दुर्मिळ व्हिडिओ आता हळूहळू समोर येत आहेत. हे १००% मूळ फुटेज आहे, एआय (AI) द्वारे तयार केलेले नाही”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “शेवटी थकल्या-भागल्या अवस्थेत चालत जाणेच सर्व काही सांगून जाते. तो आपल्या कुटुंबापर्यंत पोहोचला होता आणि त्याच्या मनात केवळ तोच विचार होता”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “शेवटी थकल्या-भागल्या अवस्थेत चालत जाणेच सर्व काही सांगून जाते. तो आपल्या कुटुंबापर्यंत पोहोचला होता आणि त्याच्या मनात केवळ तोच विचार होता”.
टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.






