(फोटो सौजन्य: Instagram)
काय घडलं व्हिडिओत?
इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक मजेदार दृष्य दिसले ज्यांनी सर्व यूजर्सना थक्क करुन सोडले. व्हिडिओमध्ये, मुलगा आवाज देत पाण्याच्या दिशेने धावताना दिसतो, तो वेगाने पाण्यात जातो आणि पुढील दृष्यातच आपल्याला पाण्यातून एक मगर बाहेर येताना दिसते. मगरीला पाहताच तो तिच्या जवळ जातो आणि मगरीचे दात घासायला सुरुवात करतो. मुलगा अजिबात असं करताना घाबरत नाही आणि मुख्य म्हणजे, मगरही गूपचूप त्याला कोणतीही इजा न करता त्याच्याकडून फ्रीमध्ये दात साफ करुन घेते. हे दृष्य पाहणे फारच रंजक ठरते. पाण्याचा राक्षस म्हणून ओळखली जाणारी मगर एका चिमुकल्याकडून दात साफ करत आहे हे पाहून लोकांना हसू आलं, तर काहींना या दृष्यांवर विश्वासच बसेनासा झाला. सोशल मिडियावर आता या व्हिडिओला चांगलेच शेअर केले जात आहे.
View this post on Instagram
A post shared by The Barpeta Things | News | Culture | Memes (@thebarpetathings)
ही घटना नक्की कुठली आहे याची अधिकृत माहिती मिळाली नसून यूजर्सद्वारे व्हिडिओला फार पसंत केले जात आहे. व्हिडिओला @thebarpetathings नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये लिहिण्यात आलं की, ‘एक निर्भय मुलगा मगरीला भेटला’. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या दृष्यांवर आपले मत व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “टेक्नोलोजिया”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ते आपल्या देशाचे पुढील पंतप्रधान असतील” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “एकमेव धोका म्हणजे असा माणूस जो दुसऱ्या माणसाला समजत नाही. हे प्राणी माणसांपेक्षा श्रेष्ठ आहेत”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






