(फोटो सौजन्य: X)
काय आहे प्रकरण?
सोशल मिडियावर व्हायरल झालेली ही घटना हरियाणातील असल्याचे सांगण्यात येत आहे. मुलीची वरात निघाली. कुटुंबियांनी आणि नातेवाईकांनी तिचा निरोप घेतला. सर्व काही मजेत आणि हास्यविनोदात सुरळीत चालले होते, पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. हे सर्व दृष्य आपल्या कॅमेरात कैद करणाऱ्या कॅमेरामॅनवरच काळाचा घाला पडतो. रस्त्याच्या कडेला उभे राहून तो बिदाईचे दृष्य आपल्या कॅमेरात कैद करु पाहतो आणि तितक्यातच एक वेगवान चारचाकी त्याला जोरदार धडक देते. धडक इतकी जोरदार होती की, कॅमेरामॅन फुटबाॅलप्रमाणे हवेत फेकला गेला. हे दृष्य पाहणे फारच धक्कादायक होते. उपस्थित लोक देखील हे दृष्य पाहून घाबरले आणि लग्नाच्या बिदाईत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. लोकांच्या किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या.
📍 Sirsa, Haryana: During a wedding farewell, a speeding hatchback first hit and flung the cameraman, then lost control and rammed into people gathered outside. Moments earlier, the family was celebrating the bride’s departure, within seconds, chaos unfolded as the car ploughed… pic.twitter.com/ZMdgIRA8up — Deadly Kalesh (@Deadlykalesh) April 22, 2026
माहितीनुसार जखमीला रुग्णालयात दाखल केले असून पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. घटनेचा व्हिडिओ @Deadlykalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेची माहिती देण्यात आली असून अनेक यूजर्सने यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका यूजरने म्हटले की, “कॅमेरामन रस्त्याच्या मधोमध होते आणि दुसरे म्हणजे, गाडी वेगमर्यादेपेक्षा अधिक वेगाने धावत होती”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “चालक आणि कॅमेरामन-दोघांनाही वाटले की, हा रस्ता त्यांच्या बापाचा आहे. अतिशय भीषण अपघात” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “आता कोणीही असे म्हणणार नाही की, कॅमेरामन कधीच मरत नाही”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






