Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

१ रुपयांत भरपेट नाश्ता! भारतामध्ये ‘या’ ठिकाणी मिळतो सर्वात स्वस्त नाश्ता; सकाळीच भरते खवय्यांची गर्दी; Video Viral

1 Rupees Breakfast : काय सांगता... फक्त रुपयांत मिळतो भरपेट नाश्ता? अहो खोटं नाही हे आहे वास्तवातील सत्य! देशाच्या एका ठिकाणी आजही नाश्त्याचे एक असे दुकान चालवले जाते जिथे गरमागरम नाश्त्याचे पदार्थ फक्त १ रुपयाला विकले जातात.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 30, 2026 | 01:44 PM
१ रुपयांत भरपेट नाश्ता! भारतामध्ये 'या' ठिकाणी मिळतो सर्वात स्वस्त नाश्ता; सकाळीच भरते खवय्यांची गर्दी; Video Viral

१ रुपयांत भरपेट नाश्ता! भारतामध्ये 'या' ठिकाणी मिळतो सर्वात स्वस्त नाश्ता; सकाळीच भरते खवय्यांची गर्दी; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • महागाईच्या काळातही फक्त १ रुपयांत मिळतो नाश्ता
  • राम बाबू अन्ना २५ वर्षांपासून जपतात अनोखी परंपरा
  • इडली, उपमा, पोह्यांसह भरपेट नाश्ता; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
देशात महागाई सातत्याने वाढत असताना पूर्वाीप्रमाणे आता १-२ रुपयांना काही खरेदी करता येत नाही. साधी पाण्याची बाटली किंवा चहा जरी खरेदी करायचा असला तरी आपल्याला १० रुपये मोजावे लागतात. अशात विचार करा आम्ही तुम्हाला सांगितलं की, फक्त १ रुपयांत तुम्ही भरपेट नाश्ता करु शकता तर यावर तुमचा विश्वास बसेल का? महगाईच्या या युगात १ रुपयांना नाश्ता मिळणे ही गोष्ट जवळपास अशक्य वाटणारी आहे. पण आम्ही तुम्हाला सांगतो की, हे खोटं नसून खरं सत्य आहे. भारतात असे एक दुकान आजही सुरु असून याचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आलेला आहे. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

‘डीएम अंकल, रोड बनवून द्या…’, शाळकरी मुलीची जिल्हाधिकाऱ्यांना आर्त हाक, रस्त्यावरील खड्डे आणि साचलेल्या पाण्यामुळे होतोय त्रास

२५ वर्षांपासून एकच भाव

सोशल मिडिया क्रिएटरने हे अनोखे ठिकाण शोधून काढले असून याचा व्हिडिओ इंटरनेटवर सध्या चांगलाच चर्चेत आहे. हे दुकान मागील २५ वर्षांपासून सुरु असून दुकानदाराने येथील पदार्थांची चव आणि पैशांमध्ये कधीच कोणता बदल केला नाही. आजही १ रुपयांत इथे लोकांना नाश्ता खाण्यासाठी सर्व्ह केला जातो आणि आनंदाने लोक इथून भरपेट नाश्ता करुन आपल्या दिवसाची सुरुवात करतात. या अनोख्या गोष्टीचे श्रेय दुकानमालक राम बाबू अन्ना यांना जाते.

काही लोक हे पैसे कमवण्यासाठी व्यावसाय करतात पण काही लोक हे लोकांना जेवण खाऊ घालण्याला आपले खरे पुण्य मानतात. राम बाबू अन्ना देखील याचेच एक उत्तम उदाहरण आहेत. त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती चांगली नव्हती. त्यांनी आजूबाजूला गरिबी पाहिली होती. अनेकदा पैशांच्या कमतरतेमुळे ते नाश्ता न करताच घरातून बाहेर पडायचे. यावरुन त्यांना कल्पना आली की, कमी पैशात नाश्त्याचे दुकान सुरु करायचे जेणेकरुन कुणीही उपाशी राहू नये. घराजवळील जागा भाड्याने विकत घेऊन त्यांनी नाश्त्याचे दुकान सुरु केले. इथे ते इडली, उपमा, पोहे असे पदार्थ सर्व्ह करतात. सर्व पदार्थ इथे फक्त १ रुपयांत विकले जातात. अनेकांनी सुरुवातीला त्यांना पागल म्हटलं पण १ रुपयांत नाश्ता खाऊ घालण्याची ही परंपरा ते २५ वर्षांपासून निरंतर पार पाडत आहेत.

‘जिगरबाज ड्रायव्हर!’ निवासी भागात ट्रकला लागली भीषण आग; स्वतःचा जीव धोक्यात घालून रोखला अनर्थ; Video Viral

सुरुवातीला राम बाबू अन्ना यांना नुकसान झाले पण आपल्या निर्णयावर ते शेवटर्यंत ठाम राहिले. त्यांनी सांगितले की, पैसे कमवणे हे त्यांचे ध्येय कधीच नव्हते तर लोकांची सेवा करणे हे त्यांचे ध्येय आहे. एक रुपये ही किंमत त्यांनी यासाठी ठेवली जेणेकरुन लोकांना स्वाभिमानाने हे अन्न विकत घेऊन खाता येईल. हळूहळू दुकानाची चर्चा वाढली आणि आजूबाजूच्या गावातून लोक राम बाबू अन्नाच्या दुकानात नाश्त्याची चव चाखण्यासाठी येऊ लागले. पहाटेपासूनच दुकानाची सर्व तयारी सुरु होते आणि सकाळच्या प्रहरी इथे नाश्ता विकायला सुरुवात होते. मजदूर, शाळेचे विद्यार्थी, वृद्ध असे सर्वजण मिळून इथे नाश्ता करतात. विशेष म्हणजे, किंमत कमी असली तरी पदार्थांच्या चवीची आणि जागेच्या स्वच्छतेची इथे खास काळजी राखली जाते. दुकानाचे नेमके ठिकाण व्हिडिओत नमूद करण्यात आलेले नाही पण व्हिडिओतील कमेंटमध्ये एका यूजरने हे दुकान आंध्र प्रदेशमध्ये असल्याचा दावा केला आहे.

टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.

Web Title: One rupee breakfast shop ram babu anna 25 years cheap food viral video india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2026 | 01:44 PM

Topics:  

  • Breakfast Dishes
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

CA अवंतिका भट्टने कुत्र्याच्या भांड्यातून प्यायले पाणी; यूट्यूबर साैरव जोशीची पत्नी चर्चेत; Video Viral
1

CA अवंतिका भट्टने कुत्र्याच्या भांड्यातून प्यायले पाणी; यूट्यूबर साैरव जोशीची पत्नी चर्चेत; Video Viral

पतीशी भांडण अन् पत्नीने मारली विहिरीत उडी! बराच वेळ रंगला हायव्होल्टेज ड्रामा; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
2

पतीशी भांडण अन् पत्नीने मारली विहिरीत उडी! बराच वेळ रंगला हायव्होल्टेज ड्रामा; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल

गरीबीचा विदारक चेहरा! उपचारासाठी पैसे नाहीत म्हणून रुग्णालयाने बेशुद्ध मुलीला आणि वडिलांना काढलं बाहेर; बीडमधील Video Viral
3

गरीबीचा विदारक चेहरा! उपचारासाठी पैसे नाहीत म्हणून रुग्णालयाने बेशुद्ध मुलीला आणि वडिलांना काढलं बाहेर; बीडमधील Video Viral

मोबाईल चोरल्याचा आरोप, प्रवाशांनी धरलं अन् चालू ट्रेनमध्येच खिडकीत लटकवलं; Video Viral
4

मोबाईल चोरल्याचा आरोप, प्रवाशांनी धरलं अन् चालू ट्रेनमध्येच खिडकीत लटकवलं; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.