
न पासपोर्ट, न व्हिसा! लेकीच्या लग्नाला पोहोचता आले नाही म्हणून आई-वडिलांनी केले 'डिजिटल कन्यादान'; Video Viral
काय दिसलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात आई-वडिल आपल्या एकुतल्या एक मुलीच्या लग्नात ऑनलाईन पद्धतीने सामील होताना दिसून आले. व्हिडिओत द्वा केला आहे की, मुलगी अमेरिकेत जाॅब करत असून तिथे एक विवाहित व्यक्तीच्या ती प्रेमात पडली. पुढे दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. तथापि, काही काही व्यक्तिगत कारणामुळे आई-वडिलांना प्रत्यक्षरित्या या लग्नात सामील होता आलं नाही ज्यामुळे लाईव्ह स्ट्रीमिंगच्या मदतीने त्यांनी मुलीच्या लग्नाला आपली उपस्थिती दर्शवली.
व्हिडिओमध्ये स्क्रिनवर वधू-वराचे मंडपात विधी सुरु असताना घरी असलेले आई-वडिल टीव्हीसमोर उभे राहून तांदूळ आणि फुलांचा वर्षाव करत दोघांनाही आशिर्वाद देताना दिसून आले. व्हिडिओतील हा प्रकार सध्या अनेकांना थक्क करत असून वाढत्या डिजिटल युगात नात्यातील दुरावा वाढत असल्याच्या प्रतिक्रिया काही यूजर्सने दिल्या आहेत.
Parents became emotional. Parents witnessed their daughter’s marriage online as they couldn’t join her in America. Himabindu, Who Works in America, Fell in Love with and Married Rohit Kumar, Whom She Met There. Later parents arranged a wedding feast for the guests in their… — Neetu Khandelwal (@T_Investor_) August 30, 2026
घटनेचा हा व्हिडिओ @T_Investor_नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. अनेक यूजर्सने व्हिडिओवर कमेंट्स करत यातील दृष्यांवर आपले मत व्यक्त केले. एका यूजरने म्हटले की, “शक्य असेल तिथे मुलांनी आपल्या पालकांच्या उपस्थितीतच विवाह करावा. त्यांना परत येण्यापासून किंवा पालकांना अमेरिकेत आपल्याकडे बोलावण्यापासून कशामुळे रोखले जात होते हे मला माहित नाही, पण हे सर्व दुर्दैवी वाटते”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “कोविडच्या काळात दोन्ही बाजूंच्या पालकांसोबत असताना असे काही प्रसंग अनुभवले”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “स्वत:च्या मुलीचे लग्न अशाप्रकारे अटेंड करणे याहून दुर्दैव काय?”.
टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.