Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

VIDEO VIRAL: पाकिस्तानच्या हरिपूरमध्ये गॅस पाईपलाईनचा स्फोट! हत्तर औद्योगिक वसाहतीत आगीचे तांडव; 8 मृत्यू अन् अनेक घरे खाक

Pakistan उत्तर प्रदेशातील हरिपूर येथे गॅस पाइपलाइनच्या स्फोटात आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हत्तर औद्योगिक वसाहतीत लागलेल्या भीषण आगीने निवासी भागांनाही वेढले. वाचा याबबत सविस्तर अपडेट.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 17, 2026 | 11:23 AM
pakistan haripur gas pipeline explosion hattar industrial estate 8 dead 2026

pakistan haripur gas pipeline explosion hattar industrial estate 8 dead 2026

Follow Us
Follow Us:
  • पाकिस्तानमध्ये महाभयंकर स्फोट
  • निवासी भागांना आगीचा वेढा
  • गुदमरून झाला मृत्यू

Hattar Industrial Estate gas blast video 2026 : पाकिस्तानच्या (Pakistan) खैबर पख्तुनख्वा प्रांतातील हरिपूर जिल्हा गुरुवारी सायंकाळी एका भीषण दुर्घटनेने हादरून गेला. हरिपूरमधील प्रसिद्ध हत्तर औद्योगिक वसाहतीत (Hattar Industrial Estate) गॅस पाईपलाईनचा अत्यंत शक्तिशाली स्फोट झाला. या दुर्घटनेत आतापर्यंत ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून मृतांमध्ये लहान मुले आणि महिलांची संख्या मोठी असल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. स्फोट इतका भीषण होता की त्याचा आवाज कित्येक किलोमीटरपर्यंत ऐकू आला आणि आगीच्या ज्वाळांनी आकाशाला गवसणी घातली.

औद्योगिक वसाहतीत आगीचे थैमान

ही दुर्घटना गुरुवारी संध्याकाळी ६:३० च्या सुमारास ग्रँड ट्रंक रोडजवळ असलेल्या एका कारखान्याजवळ घडली. ‘सुई नॉर्दर्न गॅस’ची १६ इंची मुख्य पुरवठा वाहिनी अचानक फुटली आणि भीषण स्फोट झाला. या स्फोटानंतर लागलेली आग इतकी वेगाने पसरली की तिने जवळच असलेल्या निवासी वसाहतींमधील ३ ते ४ घरांना आपल्या कचाट्यात घेतले. आगीचे लोळ पाहून लोकांची एकच पळापळ झाली. या घटनेचा एक थरारक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये आगीच्या ज्वाला निवासी भागांना वेढताना दिसत आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Cameroon Tour: ‘हुकूमशहा जगाचा विनाश…’ पोप लिओ यांचा ट्रम्पवर विखारी हल्ला; अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचीही आगपाखड

मृत्यूचे तांडव: मृतांमध्ये ७ चिमुरड्यांचा समावेश

स्थानिक आपत्कालीन सेवा ‘रेस्क्यू ११२२’ आणि उपायुक्त वसीम अहमद यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे मृतांमध्ये ७ लहान मुले आणि एका महिलेचा समावेश आहे. मोबीन (७ वर्षे), अस्मा (१४ वर्षे), अलीना (१६ वर्षे), इक्बाल (७ वर्षे), शाहिदउल्ला (९ वर्षे), आरिफ (१५ वर्षे), अली रझा (१८ वर्षे) आणि अब्दुल्ला रेहमान अशी मृतांची नावे समोर आली आहेत. बहुतांश मृत्यू हे आगीमुळे नव्हे, तर धुरामुळे श्वास गुदमरून झाल्याचे वैद्यकीय अहवालात म्हटले आहे.

🚨 A massive fire broke out in the Hattar Industrial Area of Haripur District, Khyber Pakhtunkhwa, Pakistan. pic.twitter.com/S98tz9qojC — Global News & Geopolitics 🌍 (@GlobalNewsGeo) April 16, 2026

credit – social media and Twitter

बचावकार्य आणि आव्हाने

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. तब्बल ३ तासांच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. बचाव पथकाने ४ महिला आणि ६ मुलांना आगीच्या वेढ्यातून सुखरूप बाहेर काढले आहे. जखमींना तातडीने हरिपूर जिल्हा मुख्यालय रुग्णालय आणि ‘आरएचसी कोट नजीबुल्ला’ येथे दाखल करण्यात आले आहे. अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : War Update : एक मत अन् ठरलं जगाचं भवितव्य! रिपब्लिकनचा डेमोक्रॅट्सवर प्रहार; इराण युद्धावरून अमेरिका दोन भागात विभागली

जीर्ण पायाभूत सुविधा की घातपात?

पाकिस्तानमध्ये औद्योगिक अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. हरिपूरचे उपायुक्त वसीम अहमद यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. पाईपलाईनचा स्फोट तांत्रिक बिघाडामुळे झाला की मानवी निष्काळजीपणामुळे, याचा तपास पोलीस करत आहेत. पाकिस्तानमधील गॅस पाईपलाईन्स जुन्या झाल्या असून त्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण खैबर पख्तुनख्वा प्रांतात संतापाची लाट पसरली आहे.

Web Title: Pakistan haripur gas pipeline explosion hattar industrial estate 8 dead 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2026 | 11:23 AM

Topics:  

  • gas leak
  • Pakistan News
  • Video Viral

संबंधित बातम्या

‘मला सोडून नको जाऊस…’ रेल्वे स्थानकावरच बाॅयफ्रेंडने गर्लफ्रेंडचे धरले पाय, अखेर पोलिसांनीच केला हस्तक्षेप; Video Viral
1

‘मला सोडून नको जाऊस…’ रेल्वे स्थानकावरच बाॅयफ्रेंडने गर्लफ्रेंडचे धरले पाय, अखेर पोलिसांनीच केला हस्तक्षेप; Video Viral

‘हात तुटून जाईल दादा…’, ट्रेनच्या खिडकीतून फोन हिसकावू पाहत होता चोर, प्रवाशांनी घडवली जन्माची अद्दल; Video Viral
2

‘हात तुटून जाईल दादा…’, ट्रेनच्या खिडकीतून फोन हिसकावू पाहत होता चोर, प्रवाशांनी घडवली जन्माची अद्दल; Video Viral

Fact Check : पत्नीने पतीला मारत मृतदेह गॅस सिलेंडरमध्ये लपवला? Viral Video मागील सत्य पोलिसांनी केलं उघड
3

Fact Check : पत्नीने पतीला मारत मृतदेह गॅस सिलेंडरमध्ये लपवला? Viral Video मागील सत्य पोलिसांनी केलं उघड

अरे बापरे… मशीन्सनाही झालं प्रेम? रोबोट वर आणि रोबोट वधू, अनोख्या विवाहाच्या व्हिडिओने यूजर्सना केलं थक्क; Video Viral
4

अरे बापरे… मशीन्सनाही झालं प्रेम? रोबोट वर आणि रोबोट वधू, अनोख्या विवाहाच्या व्हिडिओने यूजर्सना केलं थक्क; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.