Panchat Jokes Read Student Teacher Hillarious Jokes Which Will Makes You Laugh
पांचट Jokes: शिक्षक – “I Love You” चा शोध कोणी लावला ? गण्या – चायनाने…; कारण ऐकून हसून हसून पोट दुखेल
शिक्षकांचे प्रश्न आणि त्यावर विद्यार्थ्यांचे खोडसर उत्तर तुमच्या चेहऱ्यावर हसू आणेल. कामाच्या व्यापातून थोडा वेळ काढत खळखळून हसा आणि या जोक्सची मजा लुटा.
बाई वर्गात व्याकरण शिकवत होत्या शिक्षिका: मुलांनो तुकाराम लिहून दाखवा पाहू बंडू: बाई, तुकारामाची ‘तू’ पहिली का दुसरी ?
बाईंनी बंडू ला झोड झोड झोडला
बंडू ला अजून कळलं नाहीये की बाईंना एवढा कसला राग आला
शिक्षक: सोन्या सांग की चंद्रावर पहिलं पाऊल कुणी टाकलं? सोन्या: निल आर्मस्ट्राँग शिक्षक: अगदी बरोबर आणि दुसरं पाऊल कुणी टाकलं? सोन्या: तेनच टाकल आसल… ते काय लंगड वाटल व्हय तुमाला
शिक्षकाने विद्यार्थ्यांना निबंध लिहायला सांगितलं… विषय होता “आळस म्हणजे काय”
एका विद्यार्थ्याने सर्व पानं कोरी ठेवली आणि शेवटी फक्त तीनच शब्द लिहीले, ‘यालाच म्हणतात आळस.’
शिक्षक: एक बाई एका तासांत 50 पोळ्या बनवत असेल, तर तीन बायका एका तासांत किती पोळ्या बनवतील ? बंड्या: एकही नाही. कारण, ती एकटी आहे म्हणूनच तर काम करते. तिघीजणी मिळून फक्त गप्पा मारतील
शिक्षक: “I Love You” चा शोध कुणी लावला ? गण्या: चायनाने…. शिक्षक: कसं काय? गण्या: याची काही Garantee आणि Warranty नाही… चला तो चांद तक नही तो शाम तक
शिक्षकः “मी तुझा जीव घेईन” याच इंग्रजीत भाषांतर कर हऱ्या: इंग्रजी गेलं XXXX… तू हात तरी लाऊन बघ
शिक्षिका: चंप्या पुन्हा नापास झालास? अरे जरा त्या पिंकीकडे बघ, तिला ९०% मिळाले आहेत चंप्याः अहो बाई, तिच्याकडे बघत राहिलो म्हणूनच तर नापास झालो
शिक्षकांनी गण्याला परीक्षेच्या निकालावर आईची सही आणायला सागितली दुसऱ्या दिवशी शिक्षक: हे काय आहे @@@@ गण्या: आईची सही शिक्षक – आईचं नाव काय आहे? गण्या – जलेबीबाई
वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी शिक्षक मार्गदर्शन करत होते. शिक्षक: समजा, मला वेगवेगळ्या विषयावरची भरपूर पुस्तक वाचायची असतील तर प्रथम मला काय करावं लागेल ? एक विद्यार्थी: प्रथम तुम्हाला चष्मा लावावा लागेल
शिक्षिका: मण्या तू वर्गात सारखा मुलींशी गप्पा मारत असतो मण्या: बाई मी गरिब घरचा आहे मला “What’s app” परवडत नाही
शिक्षिका: गण्या, एकीकडे पैसा, एकीकडे अक्कल, तु काय निवडशिल ? गण्या: पैसे शिक्षिका: गण्या चूक, मी अक्कल निवडली असती गण्या: तुमच बरोबर आहे बाई, ज्याच्याकडे जे नसतं त्याने तेच घ्यायच असतं…
शिक्षक: जर एखादा छोटा ग्रह पृथ्वीवर आदळला तर काय होईल ते सांगा? पप्पू: खूप मोठा आवाज येईल शिक्षक: का? पप्पू: कारण… सनी लिओनीने गायले आहे, ये दुनिया पित्तल दी… ये दुनिया पित्तल दी…
शिक्षक: ‘वसंतने मला मुक्का मारला’ हे वाक्य इंग्रजीत भाषांतरित करा संजू: वसंतपंचमी
Web Title: Panchat jokes read student teacher hillarious jokes which will makes you laugh