पांचट Jokes : उठलात? आज काय दिवे लावणार? त्यापेक्षा वाचा 'हे' भन्नाट मराठी जोक्स (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
असे म्हणतात हसण्याने आयुष्य वाढते, हास्य तुम्हाला निरोगी ठेवते. यामुळेच रोजच्या आयुष्यात दिवसातून एकदा तरी खळखळून हसले पाहिजे. यामुळे तुमचा थकवा आणि ताण दूर होईल. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी घेऊ आलो आहोत काही खास मजेशीर विनोद, जे वाचून तुम्ही हसून हसनू लोटपोट व्हाल… चला तर मग एकत्र मिळून खळखळनू हसूयात आणि आपले आयुष्य वाढवूयात.
आजचे शहाणपण…
पापाचा घडा भरला की…
.
.
घड्याच्या जागी ड्रमचा वापर केला पाहिजे..!!!
शिक्षक आणि रामू…
शिक्षक : रामू I have a Pen चं मराठीत भाषांतर सांग
रामू : माझ्याकडे पेन आहे.
शिक्षक : छान! आता We Have a Pen चं सांग
रामू : सर, सगळ्यांनी एकच पेन वापरायचा का?
गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड…
गर्लफ्रेंड : ऐक ना, मी लठ्ठ दिसते का?
बॉयफ्रेंड : नाही गं, तुझ्या आसपासचे वातावरण जरा जडं वाटतयं!
नवरा-बायको
बायको : जर माझे राक्षसाशी लग्न झाले असते, तर मी आज एवढी दु:खी नसते…!
नवरा : अगं वेडे, रक्त्याच्या नात्यात कोणी लग्न करते का?
यानंतर बायकोने नवऱ्याला धु धु धुतला
चिंटू आणि डॉक्टर
चिंटूला काही दिवसांपासून झोप येत नसते, यामुळे तो डॉक्टरकडे जातो आणि म्हणतो…
चिंटू : डॉक्टर, मला झोप येत नाही.
डॉक्टर : झोपताना तुमचा मोबाईल कुठे असतो?
चिंटू : माझ्याजवळ.
डॉक्टर : आजपासून, मोबाईला बाजूला ठेवा.
चिंटू : पण, डॉक्टर मोबाईशिवाय माझं आयुष्यचं झोपलेलं आहे…
दोन मित्रांमध्ये बायकोवरुन बोलणं सुरु होतं, पहिला मित्र म्हणतो…
मित्र १ : अरे काल मी माझ्या बायकोला म्हणालो, “तू देवदासी आहेस.”
मित्र २ : मग तर ती खुश झाली असेल?
मित्र ३ : नाही रे, ती म्हणाली – मग मला स्वर्गातच ठेव, किचनमध्ये नाही!
पांचट जोक्स: नवरा की बायकोचा कुत्रा? वाचा जरूर






