Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शाळा आहे की काळ्या पाण्याची कोठडी! 7 वर्षाच्या मुलाला बेदम मारलं, पाय बांधून उलट लटकवलं अन्… पाहूनच उडेल थरकाप; Video Viral

Teacher Brutally Beates Children : शिक्षक आहे की हिटलर...! विद्यार्थ्याला शिक्षा देण्यासाठी शिक्षिकेने उचलले भीषण पाऊल, कानाखाली मारलं, पाय बांधून लटकवलं अन् दृश्य पाहून असं वाटेल की ही शाळा नसून एक जेलच.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 02, 2025 | 10:50 AM
शाळा आहे की काळ्या पाण्याची कोठडी! 7 वर्षाच्या मुलाला बेदम मारलं, पाय बांधून उलट लटकवलं अन्... पाहूनच उडेल थरकाप; Video Viral

शाळा आहे की काळ्या पाण्याची कोठडी! 7 वर्षाच्या मुलाला बेदम मारलं, पाय बांधून उलट लटकवलं अन्... पाहूनच उडेल थरकाप; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

शाळा हे विद्येचे माहेरघर मानलं जातं. हे तेच ठिकाण आहे जिथे विद्यार्थ्यांना चांगल्या वाईट गोष्टी शिकवल्या जातात त्यांचे भविष्य घडवलं जातं पण हरियाणातील पाणीपत जिल्ह्यातील एका खाजगी शाळेत एक नवाच प्रकार उघडकीस आला. मुलाच्या चुकीवर त्याला शाळेत इतकी भीषण शिक्षा देण्यात आली की याचे दृश्य पाहून सर्वच हादरून गेले. याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. चला नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

शिकाऱ्याच्या जबड्यात अडकलं होत मुलं, मग चिंपांझीने असं काही केलं… मगरीला घडली जन्माची अद्दल; Video Viral

शाळा ही विद्यार्थ्यांसाठी केवळ शिक्षणाचं केंद्र नसून, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या घडणीचं मंदिर असतं. पण हरियाणातील पाणीपत जिल्ह्यातील एका खासगी शाळेत शिक्षकांनीच या मंदिराची पवित्रता कलंकित केली असून, अल्पवयीन विद्यार्थ्यांना अमानुष मारहाणीचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे.

काय आहे प्रकार?

ही धक्कादायक घटना पाणीपतच्या जटल रोडवरील ‘सृजन पब्लिक स्कूल’ मध्ये घडली. समोर आलेल्या माहितीप्रमाणे, या शाळेत दुसऱ्या इयत्तेतील एका विद्यार्थ्याने गृहपाठ न केल्यामुळे, प्राचार्या रीना हिने त्याला दोरीने खिडकीला उलटे लटकवून बेदम मारहाण केली. इतकंच नाही, तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये इतर विद्यार्थ्यांनाही निर्दयपणे कानाखाली मारताना ती दिसते. या प्रकारामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिक्षण देणाऱ्या संस्थेच्याच भिंतीत जर अशी क्रूरता घडत असेल, तर पालकांनी आपल्या मुलांचं संरक्षण कुठे शोधावं, हा प्रश्न समोर येतो.

शासनाची तातडीने कारवाई

घटनेनंतर शिक्षण मंत्री महिपाल डांढा यांनी या प्रकरणाची दखल घेत, संबंधित शाळेला तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, राज्यातील इतर शाळांना देखील सख्त इशारा देण्यात आला आहे – जर विद्यार्थ्यांवर शारीरिक शिक्षा करताना आढळले, तर कठोर कारवाई केली जाईल. या प्रकरणी पालकांकडून पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. तपासादरम्यान, डीएसपी सतीश वत्स यांनी माहिती दिली की, शाळेच्या प्राचार्या रीना आणि ड्रायव्हर अजय यांना पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. सध्या अधिक तपास सुरू आहे.

Brutally beating kids and hanging a 7-year-old upside down from a classroom window is not punishment.😡 Parents have filed a police complaint, exposing the principal’s negligence.pic.twitter.com/DGY8bKv9mm — ShoneeKapoor (@ShoneeKapoor) September 30, 2025

अरे हा काय प्रकार…! मागून अँटिक कार तर पुढून बैलगाडी, Tesla ला ही लाजवेल असं मॉडिफिकेशन… पाहून सर्वच झाले दंग; Video Viral

समाज म्हणून विचार करण्याची वेळ

या घटनेने बालहक्क, शैक्षणिक संस्था यांची जबाबदारी, आणि शिक्षकांच्या संवेदनशीलतेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणला आहे. लहान मुलांवर शारीरिक शिक्षा करून शिक्षण दिलं जात नाही, तर त्यांच्या मनात भीती आणि तिरस्काराचे बीज पेरले जाते. अशा घटनांनी समाज आणि शिक्षणव्यवस्थेची संवेदनशीलता तपासली जाते, आणि दोषींना केवळ शिक्षा नव्हे तर कायमची नोंद ठेवून भविष्यात अशा प्रकारांना आळा घालणे आवश्यक आहे. शाळा ही ज्ञानाची गंगा आहे, पण जर तिथंच हिंसाचाराची नांदी होत असेल, तर अशा शिक्षणाला समाजात स्थान देता येणार नाही. अशा घटनांवर तात्काळ आणि ठोस कारवाई होणं ही काळाची गरज आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Panipat child hung upside down and beaten in school video went viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2025 | 10:50 AM

Topics:  

  • beating video
  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

शिकाऱ्याच्या जबड्यात अडकलं होत मुलं, मग चिंपांझीने असं काही केलं… मगरीला घडली जन्माची अद्दल; Video Viral
1

शिकाऱ्याच्या जबड्यात अडकलं होत मुलं, मग चिंपांझीने असं काही केलं… मगरीला घडली जन्माची अद्दल; Video Viral

Viral news : जोडप्याने ८० वर्ष जुनं घर खरेदी केलं अन् घडलं भयंकर ; घराच्या बाथरुममध्ये सापडली कवटी, जाणून घ्या काय आहे प्रकरण?
2

Viral news : जोडप्याने ८० वर्ष जुनं घर खरेदी केलं अन् घडलं भयंकर ; घराच्या बाथरुममध्ये सापडली कवटी, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

अरे हा काय प्रकार…! मागून अँटिक कार तर पुढून बैलगाडी, Tesla ला ही लाजवेल असं मॉडिफिकेशन… पाहून सर्वच झाले दंग; Video Viral
3

अरे हा काय प्रकार…! मागून अँटिक कार तर पुढून बैलगाडी, Tesla ला ही लाजवेल असं मॉडिफिकेशन… पाहून सर्वच झाले दंग; Video Viral

गोंडस बाहुली की भुताटकीचं सावट? मस्ती मस्तीत भयंकर घडलं अन् महिलेच्या केसांना तिने खाऊन टाकलं; Video Viral
4

गोंडस बाहुली की भुताटकीचं सावट? मस्ती मस्तीत भयंकर घडलं अन् महिलेच्या केसांना तिने खाऊन टाकलं; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.