(फोटो सौजन्य: Instagram)
या जगात भूत आहे की नाही हे अजून स्पष्ट झालं नसलं तरी भुताटकीच्या कथा या नेहमीच लोकांमध्ये रंगत असतात. भीतीने भरलेल्या या कथा आपला थरकाप उडवतात पण तरीही लोक त्या आवडीने ऐकतात. भुतांवर अनेक चित्रपटही आले आहेत आणि ते गाजलेही आहेत पण यातील सत्यात आजवर गुलदस्त्यातच दडून बसली आहे. अशातच आता सोशल मीडियावर एक नवीन व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात एक निर्जीव बाहुली महिलेच्या केसांना चावताना, खाताना दिसून आली. निर्जीव वस्तू हालचाल करू शकत नाही अशात बाहुलीच्या कृत्याने फक्त महिलेलाच नाही तर सोशल मीडिया युजर्सनाही हादरवून सोडलं. याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून यात नक्की काय दिसून आलं ते चला सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं आहे की, हे गोंडस खेळणं अचानक भयानक बनलं. १९९६ मध्ये निरुपद्रवी कोबीज पॅच स्नॅकटाइम किड म्हणून विकले जाणारे हे खेळणे कॅनिबल डॉल म्हणून ओळखले जाऊ लागले. फक्त बनावट नाश्ता “खाऊ” ऐवजी, त्याने मुलांचे केस, बोटे आणि कपडे देखील चावायला सुरुवात केली. ऑफ स्विच नसल्यामुळे, काही मुलांना त्याच्या प्लास्टिकच्या जबड्यातून सुटण्यासाठी त्यांचे केस कापावे लागले. ५,००,००० हून अधिक बाहुल्या परत मागवण्यात आल्या आणि या धोकादायक खेळण्याबद्दलची आख्यायिका आजही संग्राहकांना सतावते”.
व्हिडिओमध्ये महिला बाहुली खरंच भुताटकीची आहे का हे तपासण्यासाठी तिच्या तोंडात आपले केसं देऊ पाहते पण पुढच्याच क्षणी बाहुली झपाट्याने तिचे केस आपल्या तोंडात ओढू लागते. महिला घाबरते आणि आपले केस वाचवण्यासाठी बाहुलीला दूर करून केस बाहेर काढण्याचा प्रयत्न करते पण बाहुली काय तिचे केस सोडत नाही आणि पटापट महिलेच्या केसांना खाण्याची प्रक्रिया सुरूच ठेवते. व्हिडिओचा शेवट इथेच होतो, महिलेसोबत पुढे काय घडलं ते अद्याप स्पष्ट झालं नाही पण या व्हिडिओने मात्र सर्वांनाच घाबरवून सोडलं.
हा व्हायरल व्हिडिओ @nandhainslice नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “सुरुवातीला तिने बाहुलीच्या तोंडात केस घातलीच कशाला” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मला त्या महिलेसाठी वाईट वाटत आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हे एखाद्या शापित गूजबंप्स एपिसोडमधील काहीतरी दिसतेय”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.