(फोटो सौजन्य: X)
या जगात जुगाडू लोकांची काही कमी नाही यात कोणतीच शंका नाही. जेव्हा गोष्टी अस्तित्वात मिळवणं अशक्य होतात तेव्हा आपला देसी जुगाड तिथे कामी येतो. लोकांचे खरे कौशल्य खरंतर या जुगाडातून आपल्याला पाहायला मिळते. सोशल मीडियावर नेहमीच जुगाडू लोकांचे अनेक पराक्रम व्हायरल होत असतात आणि एक असाच नवीन प्रकार इथे वेगाने व्हायरल होऊ लागला आहे ज्यात व्यक्तीने आपल्या आलिशान गाडीचं अर्धवट स्वप्न पूर्ण केल्याचं दिसून आलं. आता अर्धवट का ते तुम्हाला व्हिडिओ पाहिल्यानंतरच समजेल. चला व्हिडिओत काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय दिसलं व्हिडिओत?
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये सुरुवातीला एक आलिशान पुढे कार जात असल्याचे आपल्याला दिसून येते. कुणालाही हवीशी वाटेल अशी ही कार असते पण पुढच्या काही सेकंदातच सर्व चित्र पालटते. खरंतर ही कार एका जुगाडाने तयार केलेली असते. याच्या मागच्या बाजूस गाडीचा ढाचा असतो पण पुढे आपल्याला दोन बैल या गाडीला खेचून नेत असताना दिसून येतात. आतापर्यंत दिसणारी आलिशान कार कोणती गाडी नसून ती फक्त एक बैलगाडी असते. व्यक्तीने फक्त आपली गाडीची इच्छा पूर्ण करण्यासाठी हा अनोखा जुगाड केलेला असतो जो सर्वांनाच हैराण करून सोडतो. मागून आणि पुढून गाडीचे दिसून आलेले हे अनोखे रूप सर्वांनाच धक्क्यात टाकते पण युजर्सची तितकेच मनोरंजनही करते.
Reason why India is not for the beginners pic.twitter.com/v42SvShXJO — Vishal (@VishalMalvi_) September 30, 2025
दरम्यान जुगाडाचा हा अनोखा व्हिडिओ @VishalMalvi_ नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘ हेच कारण आहे की भारत नवशिक्यांसाठी का नाही’. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “भावाने आपली १०० टक्के बुद्धी वापरली आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अरे एकदम काळ बदलला, परिस्थिती बदलली” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “व्यक्ती फारच टॅलेंटेड होता”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.