नवी दिल्ली : काही उत्पादने अशी असतात की ती अमर असतात आणि ती कधीच संपणार नाहीत, त्यापैकी एक म्हणजे सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारं Parle-G बिस्किट. आता बाजारात अनेक प्रकारची नवीन बिस्किटे आली असली तरी आजही Parle-G बिस्किटांची जागा कोणीच घेऊ शकलेले नाही. क्वचितच कोणी असेल ज्याने Parle-G बिस्किटे खाल्ली नसतील.
guys new Parle G just dropped pic.twitter.com/iLaQhI3Blp
— jevliska (@hojevlo) January 2, 2023
असे बरेच लोक आहेत ज्यांना त्यांच्या लहानपणाच्या सवयीमुळे आजही या बिस्किटाशिवाय दुसरे कोणतेही बिस्किट आवडत नाही आणि ते हेच खातात, परंतु आजकाल या पार्लेने सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. ज्यावर आता अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत ज्यावर युजर्स वेगवेगळ्या कमेंट्स देत आहेत.
What kind of flavour is ats and berries? Somebody explain https://t.co/KFdfFintCe
— Hoe Das Borseman (@horsemanserves) January 3, 2023
होय, Parle-G बिस्किट पुन्हा व्हायरल होण्याचे कारण म्हणजे ‘नवीन पॅकेट’ आणि ‘नवीन चव’. होय, आता काही युजर्सनी ट्विटरवर पार्ले-जीच्या नवीन ‘अवतार’वर मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत, तर काहींना त्यांचे बालपणीचे दिवस आठवले आहेत. हे सर्व सुरू झाले जेव्हा ट्विटर युजरने @hojevlo ने Parle-G च्या पॅकेटचा फोटो शेअर केला.
guys new Parle G just dropped pic.twitter.com/iLaQhI3Blp
— jevliska (@hojevlo) January 2, 2023
फोटो शेअर करताना लिहिले- ‘मित्रांनो, नवे पार्ले-जी नुकतेच आले आहे.’ तुम्ही फोटोत बघू शकता, ते सामान्य दिसणारे लाल पॅकेट नाही. पार्ले-जीचा नवा ‘अवतार’ पाहून बहुतेक ट्विटर युजर्स ला हे दु:खच सहन झालं नाही. त्यांनी स्वप्नातही या गोष्टीचा कधी विचारही केला नव्हता या व्हायरल पॅकेटवर लिहिले आहे, ‘बिस्किटमध्ये बेरी आणि ओट्स आहेत.’
guys new Parle G just dropped pic.twitter.com/iLaQhI3Blp
— jevliska (@hojevlo) January 2, 2023
[read_also content=”‘या ठिकाणी’ मुली आपली अंर्तवस्त्रे का काढतात? याचे कारण जाणून तुम्हालाही बसेल शॉक https://www.navarashtra.com/viral/weird-news-why-do-girls-take-off-their-bra-undergarments-here-you-will-be-stunned-to-know-the-reason-you-shocked-nrvb-358931/”]
मग काय? ही पोस्ट पाहताच ती संपूर्ण देशात वाऱ्यासारखी पसरली. यानंतर, नवीन पॅकेट आणि फ्लेवर नेटिझन्समध्ये चर्चेचा मुद्दा बनला आणि आता इंटरनेट युजर्स त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
it literally dropped like 4-5 months ago 🤦🏽♂️ pic.twitter.com/UMl8kF0kZc
— Aaquib (@Aaquibshikalgar) January 2, 2023
युजर्सचे म्हणणे आहे की पार्लेने काही महिन्यांपूर्वी आपल्या बिस्किटांचे अनेक फ्लेवर्स जारी केले होते आणि हे पॅकेट देखील त्याचाच एक भाग होता. पार्लेचे हे नवीन बिस्किट चार-पाच महिन्यांपूर्वी आले आहे, हे सांगण्याचाही अनेक युजर्सनी प्रयत्न केला आहे. तर, कोणीतरी लिहिले आहे, तो आमचा बालपणीचा मित्र आहे. बालपणीच्या आठवणी परत आल्या. अशा प्रकारे लोकांनी या बिस्किटशी संबंधित त्यांच्या आठवणी शेअर केल्या आहेत.