Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 23 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काय सांगता! मोर आणि किंग कोब्रा दोघेही आले आमने-सामने, जंगलातील प्राणी समोरोसमोर येताच जे घडलं… Video Viral

Snake VS King Cobra : दोन मोर आणि एका मोरणीच्या रिंगणात अडकला किंग कोब्रा. कोब्राने फणा काढला तर मोर एकटक नजरेने त्याच्याकडे पाहत राहिला. रंजकमय या दृष्यात पुढे नक्की काय घडलं ते तुम्हीच पाहा.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 16, 2026 | 03:00 PM
काय सांगता! मोर आणि किंग कोब्रा दोघेही आले आमने-सामने, जंगलातील प्राणी समोरोसमोर येताच जे घडलं... Video Viral

काय सांगता! मोर आणि किंग कोब्रा दोघेही आले आमने-सामने, जंगलातील प्राणी समोरोसमोर येताच जे घडलं... Video Viral

Follow Us
Follow Us:
  • मोर आणि किंग कोब्रा आमने-सामने आले, पण दोघांनीही हल्ला न करता शांतपणे एकमेकांकडे पाहत राहिले.
  • तीन मोरांनी कोब्राला घेरलं होतं, तरीही परिस्थिती तणावपूर्ण पण नियंत्रित राहिली.
  • व्हिडिओत दोन्ही प्राण्यांची सावधगिरी आणि नैसर्गिक वर्तन स्पष्ट दिसून आले.
सोशल मिडियावर दररोज अनेक वेगवेगळ्या प्रकार व्हायरल होत असतात. इथे कधी धक्कादायक दृष्ये शेअर केली जातात, कधी हास्यास्पद तर कधी आश्चर्यकारक दृष्ये शेअर होतात. इथे फक्त माणसांचेच नाही तर प्राण्यांचेही अनेक व्हिडिओ शेअर होतात. असाच एक व्हिडिओ अलिकडे सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे ज्यात एक मोर आणि किंग कोब्रा आमने-सामने आल्याचे दिसले. दोन्हीही जंगलातील लोकप्रिय प्राणी आहेत पण त्यांचा स्वभाव मात्र एकसारखा नाही. मोर दिसायला सुंदर, मनमोहक दिसतो. पावासाळ्यातच जेव्हा तो नाचतो तेव्हा ते दृष्य पाहण्यासारखे ठरते. याउलट किंग कोब्रा हा जंगलातील एक धोकादायक प्राणी आहे त्याला पाहताच प्राण्यांचीच काय तर माणसांचीही पळता भुई एक होते. आता किंग कोब्राची अनेक प्राण्यांसोबतची लढाई तुम्ही पाहिली असेल पण एका मोरासमोर किंग कोब्रा काय करतो हे पाहणं मात्र मनोंरजक वळण घेते. चला दोन्ही प्राणी समोरसमोर आल्यानंतर नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

“मी पण कुणाचा तरी बाप आहे”, ऑटोचालकाने रिक्षात लिहिलं असं काही की… क्षणात व्हायरल झाला मेसेज; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक अत्यंत दुर्मिळ क्षण दिसून आला आहे जो क्वचिकच आपण कधी पाहिला असावा. किंग कोब्रा आणि मुंगूस यांना तर आपण अनेकदा समोरासमोर भिडताना पाहिले असेल पण यावेळी कोब्राच्या समोर मुंगूस नाही तर चक्क मोर होता. व्हिडिओत दिसते की, कोब्राच्या समोर दोन मोर तर मागे एक अशा तीन मोरांनी घेरुन धरलेले असते. कोब्रा त्यांच्या मधोमध आपला फणा काढून उभा असतो. तर मोर देखील एकटक नजरेने कोब्राच्या दिशेने आपली नजर लावून त्याला पाहत असतात. हा संपूर्ण प्रकार शहरी भागात नाही तर एका गावात घडून आला. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे, व्हिडिओच्या शेवटापर्यंत यापैकी एकानेही कुणावर हल्ला चढवला नाही. त्यांच्यात विचित्र शांतता आणि सावधगिरी होती, ते एकमेकांना पाहत होते, पण कुणीही हल्ला करत नव्हता ना कुणी मागे हटत होता.

आता आपल्याला वाटेल की मोर शिकार करत नसावा त्यामुळे या दृष्यात किंग कोब्रा जास्त ताकदवान आहे पण अस नाहीये. मोराची शरीररचना त्याला एक प्रभावी शिकारी बनवते. त्याची पायांची नखे तीक्ष्ण आणि मजबूत असतात, ज्यामुळे तो आपल्या भक्ष्याला पकडू शकतो. त्याची चोचही खूप मजबूत असते, ज्यामुळे तो सापाच्या डोक्यावर वारंवार प्रहार करू शकतो. जेव्हा साप जवळ येतो, तेव्हा मोर अत्यंत सावध आणि चपळ बनतो. तो योग्य संधीची वाट पाहतो आणि मग अचानक हल्ला करतो. मोराची मोठी आणि दाट पिसे त्याच्या संरक्षणातही महत्त्वाची भूमिका बजावतात. जेव्हा साप हल्ला करतो, तेव्हा त्याचा हल्ला अनेकदा पिसांमध्ये अडकतो, ज्यामुळे विष थेट शरीरापर्यंत पोहोचू शकत नाही. या दरम्यान, मोर आपल्या चोचीने सापाच्या डोक्यावर वारंवार हल्ला करतो, ज्यामुळे तो अखेरीस कमजोर होऊन मरतो.

मातृत्वाचा हळवा क्षण! मृत पिल्लाला सोडवेना, सोंडेत पकडत हत्तीणीने पिल्लाच्या शवाला नेलं अरण्यात; हृदय हेलावणारा Video Viral

व्हिडिओत दोन्ही प्राणी आमने-सामने आल्यामुळे त्यांच्यात लढाई होईल अशी शक्यता वाटत होती. पण अस काहीच घडलं नाही शेवटपर्यंत मोर आणि कोब्रा एकमेकांकडे पाहत राहतात पण हल्ला मात्र कुणीही करत नाही. घटनेचा व्हिडिओ @dadi.shanti.official नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या दृष्यांवर अनेकांनी आपले मत व्यक्त करत व्हिडिओवर कमेंट्स केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “दोन मोर, एक मादी मोर आणि त्यांच्यासमोर एक साप. आधी कोणाला मारावं, दुसऱ्या मोराला की सापाला, या विचाराने मोर गोंधळला आहे…”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “साप म्हणतो: दहशत हा आपल्याच अस्तित्वाचा अंत आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “साप आणि मोर यांच्यात फार पूर्वीपासून वैर आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Peacock and a king cobra come face to face what happened next viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • animal
  • king cobra
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

ही व्यथा काही आगळीच… सिग्नल लागताच तरुणाने लगेच बाईकच्या टाकीवर सुरु केला लॅपटाॅप; म्हणाला, हेच आहे कॉर्पोरेटचे आयुष्य
1

ही व्यथा काही आगळीच… सिग्नल लागताच तरुणाने लगेच बाईकच्या टाकीवर सुरु केला लॅपटाॅप; म्हणाला, हेच आहे कॉर्पोरेटचे आयुष्य

काय सांगता सापदेखील निघाला Oggy चा फॅन, चिमुकल्याच्या शेजारी बसून पाहू लागला कार्टून; मजेदार Video Viral
2

काय सांगता सापदेखील निघाला Oggy चा फॅन, चिमुकल्याच्या शेजारी बसून पाहू लागला कार्टून; मजेदार Video Viral

बापरे! तुरुंगात जाण्याच्या भितीने व्यक्तीने स्वत:ला जिवंतपणीच पुरले, घटनेने पोलिसही थक्क
3

बापरे! तुरुंगात जाण्याच्या भितीने व्यक्तीने स्वत:ला जिवंतपणीच पुरले, घटनेने पोलिसही थक्क

खोदकाम करताना मजुराला सापडली सुई टोचलेली बाहुली, खिळा काढताच म्हणाला, “कुणाची तरी मुक्तता झाली”; Video Viral
4

खोदकाम करताना मजुराला सापडली सुई टोचलेली बाहुली, खिळा काढताच म्हणाला, “कुणाची तरी मुक्तता झाली”; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.