PMT bus brakes failed on busy road Driver and conductors tooks action to averte accident, Video goes Viral
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. यामध्ये पुण्यातील तर अनेक मजेशीर, भन्नाट किस्स्यांचे, पुणेरी पाट्यांचे, पुणेरी लोकांच्या भांडणांचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरुन पुणेची चर्चा सुरु असते. शिवाय पुण्याची शान असणारी पीएमटी बस देखील सतत चर्चेत असते. सध्या असाच एक पुण्याच्या पीएमटी बसचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एका पीएमटी बसचा ब्रेक भर रस्त्यात फेल झाला आहे. पण त्यानंतर ड्रायव्हर आणि कंडक्टरने असे काही केले आहे की, ज्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. सध्या या घटनेची सोशल मीडियावर जोरदारा चर्चा सुरु आहे.
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक निळ्या रंगाची पीएमटी बस जाताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये युजरने सांगितले आहे की, ही बस भर रस्त्यात ब्रेक फेल झाल्याने अडकली होती. बस खूप हळू हळू जात होती. यामुळे रस्त्यावर वाहनांची गर्दी जमली होती. याच वेळी बसमधून ड्रायव्हर आणि कंडक्टर जोरा जोरात ओरडत होते. बसमधील लोकांना ब्रेक फेल झाला असल्याचे सांगत खाली उतरवत होते. बसमधील प्रवासी देखील खूप घाबरले होते.
परंतु ड्रायव्हरने बस अगदी हळू हळू घेतली. शिवाय कंडक्टरने सर्व प्रवाशांना खाली उतरवले. त्यानंतर स्वत:हा बसमधून उतरला आणि आसपासचे मोठे दगड घेतले आणि बसच्या टायरखाली ठेवले. यावेळी ड्रायव्हर देखील अत्यंत सावधगिरीने हळू बस चालवत होता. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सर्वजण ड्रायव्हर आणि कंडक्टरच्या सतर्कतेचे आणि हुशारीपणाचे कौतुक करत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @pune.arifattar या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावरक मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एका युजरने यांनी तिकटाचे भाव वाढवले पण सोय काय केली नाही, असे म्हटले आहे. दुसऱ्या एका युजरने ड्रायव्हर आणि कंडक्टरचे कौतुक पण pmpl चे केवळ तिकीट वाढवले आहेत, सुधारणा काही केल्या नाहीत असे म्हटले आहे. तिसऱ्या एकाने मस्त योग्य पाऊल उचलले ड्रायव्हर आणि कंडक्टरने असे म्हटले आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.