(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर आजवर अनेक व्हिडिओ शेअर आणि व्हायरल झाले आहेत. मात्र सध्या इथे जगभर चर्चित असलेल्या कुंभ मेळ्यातील एक भीषण प्रकार व्हायरल झाला आहे. दर 12 वर्षांनी प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्याचे आयोजन केले जाते ज्यात करोडो भाविक सामील होतात. अशात इतक्या मोठ्या जमावादरम्यान दुर्घटना घडणे स्वाभाविक आहे. याच दुर्घटनेचाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे जो आता वेगाने व्हायरल होत आहे. यात नक्की काय घडले ते सविस्तर जाणून घेऊयात.
महाकुंभ मेळ्यातील अनेक व्हिडिओज आजवर सोशल मीडियावर शेअर झाले आहेत. मात्र सध्याचा हा व्हिडिओ अनेकांचे होश उडवत आहेत. व्हिडिओतील दृश्ये अनेकांच्या अंगावर काटा आणत आहेत. तर घडले असे की, महाकुंभमेळ्यातील मौनी अमावस्येला अमृत स्नानादरम्यान बुधवारी प्रयागराजमधील संगम घाटावर चेंगराचेंगरी झाली. मौनी अमावस्येच्या शुभ मुहूर्तावर गंगा, यमुना आणि पौराणिक सरस्वती नद्यांच्या संगमावर लाखो भाविक पवित्र स्नान करण्यासाठी जमले असताना ही घटना घडली.
मौनी अमावस्या हा दिवस महाकुंभमेळ्यातील सर्वात महत्त्वाचा आंघोळीचा दिवस मानला जात असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, भाविकांच्या अचानक गर्दीमुळे गोंधळ निर्माण झाला, अनेक लोकांचा तोल गेला आणि चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत अनेकजण अक्षरशः तुडवले गेले ज्यामुळे काहींचा जागीच मृत्यू झाला तर काही गंभीर जखमी झाले. यानंतर तातडीने बचाव कार्य हाती घेण्यात आले आणि जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या चेंगराचेंगरीत एकूण 90 भाविक जखमी झाले, त्यापैकी 30 जणांचा मृत्यू झाला. अपघातात जखमी झालेल्या 60 भाविकांपैकी 36 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर 24 स्नान करणाऱ्यांना त्यांच्या घरी पाठवण्यात आले आहे.
पुण्य कमावण्यासाठी गेलेल्या अनेक भाविकांना या गर्दीतच आपला शेवटचा श्वास सोडावा लागला. या दुर्घटनेचा व्हिडिओ @prayagi_zone नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओमध्ये या चेंगराचेंगरीमुळे अमृत स्नान रद्द केल्याचे सांगण्यात आले आहे. व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून याला आतापर्यंत 2 लाखाहून अधिक लोकांनी पाहिले आहे. तसेच अनेकांनी यावर कमेंट्स करत घटनेवर आपले मत देखील मांडले आहे. एका युजरने लिहिले आहेमी “अल्लाह सर्वांचे रक्षण करो…आमीन” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मी पण तिथेच होते आणि अनेकजण यात मरण पावले आहेत”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.